बजाजने लॉन्च केली पल्सर NS400Z! करू शकतात 5 हजार रुपयांमध्ये बुकिंग, वाचा या बाईकची किंमत आणि फीचर्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतातील आघाडीची आणि प्रसिद्ध असलेल्या दुचाकी उत्पादक कंपन्यांमध्ये बजाज ऑटो हे नाव प्रसिद्ध आहे. आतापर्यंत या कंपनीने अनेक दुचाकी बाजारपेठेत लॉन्च केलेल्या असून वेगवेगळ्या किमती आणि वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसह  या बजाजच्या बाईक्सने ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

त्यामध्ये जर आपण पाहिले तर बजाज कंपनीची पल्सर ही अगदी शेतकऱ्यांपासून तर तरुणांपर्यंत प्रसिद्ध अशी बाईक आहे. याच प्रसिद्ध असलेल्या पल्सरच्या बाबतीत पाहिले तर बजाजने नुकतीच पल्सर NS400Z लाँच केली असून या नवीन पल्सर ची बुकिंग देखील सुरू करण्यात आलेली आहे. यास नवीन पल्सरचे फीचर्स काय आहेत व या बाईक ची किंमत किती आहे? त्याबद्दलची माहिती या लेखात बघू.

 बजाजने लॉन्च केली NS400Z पल्सर

बजाजने लॉन्च केलेली ही नवीन पल्सर 400cc इंजिन क्षमतेची असून ते चार रंगांमध्ये उपलब्ध आहे. या बाईकमध्ये फुल कलर एचडी डिस्प्ले आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सारखे उत्कृष्ट फीचर्स देण्यात आलेले आहेत. या बजाज पल्सरच्या पावर ट्रेनमध्ये डोमिनार ४०० सारखा एक 373 सीसी, लिक्विड कुल,

सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आलेले असून जे आठ हजार आठशे आरपीएम वर 39.4 बीएचपी पावर आणि 6500 आरपीएमवर 35 एनएमचा टॉर्क निर्माण करतो व याला हायस्पीड गिअरबॉक्स आणि एक असिस्ट व स्लीपर क्लच बरोबर जोडले आहे. तसेच या नवीन पल्सरला मोठी हेडलाईट देण्यात आलेली असून याची डीआरएल आणि एलईडी प्रोजेक्ट लाईट खूपच अट्रॅक्टिव आहेत.

या नवीन पल्सरमध्ये एलईडी लाईट, स्विचेबल ट्रॅक्शन कंट्रोल आणि चार राईड मोड देण्यात आलेले आहेत. हे मोड रोड, रेन, स्पोर्ट आणि ऑफरोड असणार आहेत. तसेच या नवीन बाईकमध्ये क्लस्टर ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देण्यात आली असून एक नवीन डिजिटल एलसीडी युनिट देखील देण्यात आला आहे.

याला तुम्ही एप्लीकेशनच्या माध्यमातून तुमच्या स्मार्टफोनमध्ये कनेक्ट करू शकता. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या बाईकच्या डिस्प्लेमध्ये तुम्हाला मिस कॉल, मेसेज आणि कॉलचे नोटिफिकेशन देखील दिसण्याची सोय करण्यात आली आहे.

 किती आहे या पल्सर NS400 ची किंमत?

बजाजच्या या नवीन पल्सरची किंमत एक लाख 85 हजार रुपये असून बजाज कंपनीच्या डॉमिनार 400 या बाईक पेक्षा 46 हजार रुपयांनी स्वस्त आहे. तसेच तुम्हाला जर या बाईकची बुकिंग करायची असेल तर तुम्ही पाच हजार रुपये भरून बजाजच्या अधिकृत वेबसाईटवरून ही दुचाकी बुक करू शकता.