मोदी सरकारच्या काळात ‘ह्यांनी’ कमावले दररोज 4700 कोटी ; काय आहे प्रकरण ? वाचा…

अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:-  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये प्रथमच सत्ता स्वीकारली. त्यानंतर आतापर्यंत देशात अनेक सुधारणा झाल्या आहेत. परराष्ट्र धोरणाबाबत अनेक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले. या काळात 370, नोटाबंदी, राम मंदिर असे अनेक निर्णय घेण्यात आले ज्यामुळे हे सरकार ऐतिहासिक बनले. त्याच वेळी, अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर, कोरोना साथीच्या रोगामुळे, एक कमकुवत वातावरण … Read more

जिओचा धमाकाः 75 रुपयांत महिनाभर फ्री कॉलिंग व 3 जीबी डेटा

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम योजना देण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करत आहेत. कंपन्या युजर्सना आकर्षित करण्यासाठी अनेक योजना ऑफर करतात. या ऑफर्सची खास गोष्ट म्हणजे ते कमी किंमतीत अधिक फायदे देतात. आज आम्ही तुम्हाला अशाच प्रकारच्या ऑफरबद्दल सांगणार आहोत. ती योजना रिलायन्स जिओची 75 रुपयांची प्लॅन ऑफर योजना आहे जी … Read more

दिल्लीतील आंदोलनाला पाठींबा देणारे नेते राज्‍यातील वीजेच्या प्रश्नावर गप्प काॽ -आ.विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:-  दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देणारे आघाडीचे नेते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची वीज तोडली जात असताना गप्प कसे बसतात ॽ असा सवाल भाजपाचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. शेत-यांवर पुतना मावशीचे प्रेम दाखविणा-या महाविकास आघाडी सरकारचा चेहरा आता उघड झाला असल्‍याची टिका त्‍यांनी केली. संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथे ग्रामपंचायतीच्या वतीने … Read more

खड्डेमय शहराची प्रतिमा बदलण्यासाठी रस्त्यांचे काम सुरु -आमदार संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:-  अल्पसंख्यांक समाजाला प्रवाहात आनण्याचे काम राष्ट्रवादीच्या माध्यमातून सुरु आहे. सर्व समाजाला बरोबर घेऊन, युवकांना दिशा देण्याबरोबर शहराच्या विकासात्मक दृष्टीकोनाने कार्य सुरु आहे. खड्डेमय शहराची प्रतिमा बदलण्यासाठी विकास आराखड्यातील सर्व रस्त्यांचे काम हाती घेण्यात आले असून, नागरिकांना चांगल्या दर्जाचे रस्ते उपलब्ध होणार आहे. राष्ट्रवादीत युवकांची शक्ती एकवटली असून, शहराचा विकासात्मक … Read more

भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या खेळाडूची राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेसाठी निवड

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- येथील अ.ए.सो. च्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचा खेळाडू ओम बाबासाहेब करांडे याची राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नुकतीच वेरुळ (जि. औरंगाबाद) येथे महाराष्ट्र राज्य सायकलिंग फेडरेशनच्या वतीने झालेल्या राज्यस्तरीय सायकलिंग स्पर्धेत करांडे याने 16 वर्षाखालील गटात रौप्य पदक पटकाविल्याबद्दल त्याची दि.5 ते 8 मार्च दरम्यान पनवेल (मुंबई) येथे होणार्‍या … Read more

महापुरुषांच्या पुतळ्यांच्या विटंबनेचे प्रकार थांबविण्यासाठी शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्या जवळ सीसीटिव्ही कॅमेरे लावा

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- महापुरुषांच्या पुतळ्यांचे विटंबनेचे प्रकार महाराष्ट्रात घडत असताना सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्या जवळ सीसीटिव्ही कॅमेरे लावण्याची मागणी अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना देण्यात आले. यावेळी मेहतर समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनी खरारे, उपाध्यक्ष तालेवर गोहेर, महासचिव अ‍ॅड. सिद्धार्थ … Read more

आरपीआयचे राष्ट्रीय नेते राजेंद्र गवई यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) चे राष्ट्रीय नेते राजेंद्र गवई यांचा वाढदिवस शहरात सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. आरपीआयच्या वतीने स्नेहालय संचलित लालटाकी येथील बालभवन मधील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले. यावेळी आरपीआयचे शहराध्यक्ष सुशांत म्हस्के, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष नईम शेख, टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष … Read more

तपोवन रोडच्या निकृष्ट कामाच्या चौकशीसाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांना निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- शहरात मुख्यमंत्री सडक योजने अंतर्गत तपोवन रोडचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, या निकृष्ट कामाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन सदर रस्त्याचे काम पुन्हा चांगल्या पध्दतीने करण्याच्या मागणीचे निवेदन प्रहार संघटनेच्या वतीने राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांना देण्यात आले. यावेळी इंजि. भाग्येश शिंदे, संतोष पवार, विनोदसिंग परदेशी, अजित धस, प्रकाश … Read more

आरबीआयची ‘ही’ मोठी घोषणा; एफडी करणाऱ्यांना होईल फायदा तर गृहकर्ज घेणाऱ्यांना ताण

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी तीन दिवसांच्या बैठकीनंतर काही निर्णय जाहीर केले. आरबीआयने पॉलिसी दरात वाढ केलेली नाही. परंतु, बँकांच्या सीआरआरला (कॅश रिझर्व प्रमाण) कोरोना पूर्व पातळीत वाढ करण्यास सांगण्यात आले आहे. याचा अर्थ बँकांशी तरलता कमी होईल. अशा परिस्थितीत व्याज दर वाढवण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला … Read more

अर्थसंकल्पाचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- बहुप्रतिक्षित अर्थसंकल्प २०२१मध्ये आर्थिक सुधारणा व विकासास चालना देण्यासाठी भरपूर निधीची तरतूद करण्यात आली आहे. वैयक्तिक अर्थविश्वाच्या कोणत्याही चर्चेसाठी गुंतवणूक, कर आकारणी आणि वापर (खरेदी/विक्री ) या तीन मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. याच अनुषंगाने अर्थसंकल्पातील तरतुदींचा आपल्या खिशावर काय परिणाम होणार आहे याचा आढावा एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे इक्विटी … Read more

चक्काजाम आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना अटक !

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- दिल्लीच्या सीमेवर दोन महिन्यांहून अधिक कालावधीपासून आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांची दखल न घेता त्यांचे आंदोलन हुकुमशाहीने दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा निषेध नोंदवून अ.भा.किसान संघर्ष समन्वय समिती व महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने शहरातील मार्केटयार्ड चौकात नगर-पुणे महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. केंद्रातील मोदी प्रणित भाजप सरकारच्या विरोधात जोदराद घोषणाबाजी करुन … Read more

आमदार जगताप म्हणाले…महावितरण विरोधात गुन्हा दाखल करा

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- महावितरण कंपनीने महापालिकेची कुठलीही परवानगी न घेता शहरातील रस्त्यांची मनमानी पद्धतीने खोदाई करून रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे, त्यामुळे संबधितांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना द्यावेत अशी मागणी आ.संग्राम जगताप यांनी जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे. नगर शहरात मुख्यत: नगर … Read more

विजेअभावी शेतातील उभी पिके जळून चालली; संतप्त शेतकऱ्यांचा महावितरणला इशारा

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- राज्यात सध्या सर्वत्र महावितरणच्या धोरणांचा निषेध केला जात आहे. वाढीव वीजबिल, सक्तीची वसुली, यामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांमध्ये महावितरण विषयी प्रचंड रोष निर्माण झाला आहे. यातच संगमनेर मध्ये शेतकऱ्यांनी महावितरण प्रशासनाला इशारा दिला आहे. संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे शेतीसाठी दोन दिवसातून केवळ आठ तासच वीज पुरवठा केला जातो. त्यामुळे पाण्याअभावी … Read more

द्वारकामाईचे दरवाजे न उघडल्यास शिवसेना आंदोलन करणार

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:-कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शिर्डी येथील साई मंदिर बंद ठेवण्यात आले होते. मात्र काही महिन्यांपूर्वी हे मंदिर पुन्हा एकदा भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. दरम्यान साईंच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ वाढला होता. तसेच कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेची नाळ जोडल्या गेलेल्या साईंच्या द्वारकामाईचे दरवाजे उघडावे, अशी शिर्डी ग्रामस्थांनी वारंवार केली आहे.P मात्र … Read more

जामखेड तालुक्यातील ‘या’ ठिकाणच्या सरपंचपदाची निवडणूक पुढे ढकलली

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या व आता सर्वांचे लक्ष लागून आहे ते म्हणजे सरपंचपदी कोणाची वर्णी लागणार याकडे. दरम्यान एक महत्वाची माहिती समोर येत आहे. जामखेड तालुक्यातील बिनविरोध झालेल्या वाकी ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणुक व साकत ग्रामपंचायत सरपंच पदाची निवड पुढे ढकलली आहे. त्यामुळे तालुक्यातील ४७ ग्रामपंचायत सरपंच पदाची निवड … Read more

वाळू तस्करांचे धाबे दणाणले’; पारनेरच्या तहसीलदारांची धडक कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- अनेक दिवस वाळू तस्करी व गौण खनिज तस्करी करण्यात येणाऱ्या वाहनांची जप्ती केली आहे. मात्र अद्यापही त्यांनी शासनाचा दंड भरलेला नाही, त्यामुळे पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी धडक कारवाई करीत, संबंधित थकित वाळू तस्कर यांच्या जंगम मालमत्ता जप्त करण्याची धडक मोहीम उघडली आहे. यात गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांमध्ये दहशत … Read more

जेऊर बायजाबाई शिवारात अपघात; एक ठार

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- नगर-औरंगाबाद रोडवरील जेऊर बायजाबाई शिवारातील तोडमल वस्तीजवळ भरधाव वेगातील सियाजकारने मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने अपघात झाला. अपघातात पांडुरंग भानुदास कराळे हे मृत्यूमुखी पावले. कराळे हे नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील मुळचे रहिवासी होते. बाबासाहेब भानुदास कराळे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार मारूती सियाज कारचे (क्र. एम. एच. १४ जी. ए. ७७०५) चालकाविरुद्ध … Read more