‘हि’लक्षणे तुमच्यात दिसताच समजून घ्या तुम्हाला कोरोना चा धोका !

कोरोना हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. हा रोग श्वसन आजार आहे (फ्लू सारखा) ज्याची लक्षणे खोकला, ताप, व अधिक गंभीर आजारात श्वास घेण्यास त्रास अशी आहेत. हात वारंवार धुवून, चेहर्‍याला स्पर्श करणे टाळून आणि आजारी लोकांचा जवळचा संपर्क टाळून तुम्ही स्वतःचे संरक्षण करू शकता. कोरोना व्हायरसच्या संक्रमित रुग्णांत जगात वेगाने वाढ होत आहे, वैज्ञानिकांनी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील सारी रुग्णाची संख्या ४२ वर !

अहमदनगर:-  जिल्ह्यात सारीचे रुग्ण आढळत असून ११ एप्रिलपासून ते आजपर्यंत ४२ रूग्ण सापडले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालय आणि विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये २३ पुरुष, १५ स्त्री आणि ०४ मुलांचा समावेश आहे. अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ०४ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव्ह अहमदनगर – जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या स्त्राव नमुन्यापैकी रात्री … Read more

विषाणू मारणारा मास्क तयार…मास्क धुऊन पुन्हा वापरता येणार

हाँगकाँग : कोरोनाच्या उद्रेकानंतर जगभरात मास्कची मागणी चांगलीच वाढली आहे. सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे मास्क आजारापासून पूर्ण संरक्षण करू शकत नाहीत. विशिष्ट प्रकारच्या मास्कची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची असल्याने हाँगकाँगमधल्या तरुणाने विषाणू मारणारा मास्क तयार केला आहे. महत्त्वाचे म्हणजे हा मास्क धुऊन पुन्हा वापरता येणार आहे. ‘सन ऑफ स्टार’ या नावाने हाँगकाँगमध्ये ओळखल्या जाणाऱ्या स्टार्क चॅन यीक-हेई … Read more

धक्कादायक : ‘त्या ‘औषधाचे दुष्परिणाम समोर

ब्राझील :- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक मागणी केलेल्या औषधाचे दुष्परिणाम आता पुढे येऊ लागले आहेत. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनमुळे रुग्णांच्या हृदयाच्या ठोक्यात अनियमितता दिसून आल्याचे ब्राझीलने आपल्या छोटेखानी अहवालात स्पष्ट केले. मनौस येथील रुग्णालयात कोरोनाबाधित ८१ जणांवर हा प्रयोग करण्यात आला. यातल्या निम्म्या रुग्णांना सलग पाच दिवस दिवसातून दोन वेळा क्लोरोक्वीन देण्यात आले. ४५० मिलीग्रॅमची मात्रा … Read more

जाणून घ्या उपवास केल्याने होणार फायदे आणि कोणी उपवास करू नयेत ?

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  नियमित उपवास केल्याने शरीरातील चरबी १० टक्क्यांनी कमी होते. कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते. हृदयाच्या आजारापासून बचाव होतो. रोग प्रतिकारक क्षमता वाढते. म्हणजे अनेक प्रकारचे व्हायरस व संसर्ग जंतूपासून आपला बचाव हाेतो. इन्सुलिनचा स्राव नियंत्रित राहण्यास मदत होते, ज्यामुळे मधुमेह होण्याचा धोका कमी होतो. नियमित उपवास केल्याने ताजेतवाने वाटते. उपवास कोणी करू नये … Read more

अहमदनगरच्या तरुण अभियंत्यांनी देशाची गरज लक्षात घेऊन केले व्हेंटिलेटर तयार !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- नगरच्या झीन मेडिकल इक्विपमेंट्‌स या फर्ममध्ये श्रीपाद पुणतांबेकर आणि गणेश जोशी या दोन अभियंत्यांनी व्हेंटिलेटर तयार केले आहे. भारतीय बनावटीच्या तंत्रज्ञानाची गरज लक्षात घेवून नगरमधील दोन अभियंते मागील दोन वर्षापासून परिश्रम घेत होते. त्यांच्या चिकाटीला, परिश्रमाला यश आले असून त्यांचे व्हेंटिलेटर आज रुग्ण सेवेसाठी तयार आहे. पुणतांबेकर हे मकेनिकल इंजिनियर असून … Read more

जगभरात कोरोनाचा कहर ! मृतांचा आकडा १९ हजारावर …

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जगभरात कोरोनाचा कहर आणखी वाढला आहे. जगभरात मृतांचा आकडा १९ हजारावर गेला आहे. जगभरातल्या मृतांची संख्या १९१०१ इतकी झाली आहे. २४ तासांत इटलीत ७४३ तर स्पेनमध्ये ६८० रुग्णांचा मृत्यू झाला होता. ही संख्या दर तासाला वाढतच आहे. जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही झपाट्यानं वाढत आहे. तब्बल १९७ देशांत कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. … Read more

जाणून घ्या लॉकडाउन म्हणजे काय ? What is a lockdown ? read information in marathi

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- करोना व्हायरसचा वाढता धोका टाळण्यासाठी ठाकरे सरकारने संपूर्ण महाराष्ट्र राज्य लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे.आज आपण जाणून घेवूयात लॉकडाउन म्हणजे काय ?  लॉकडाउन म्हणजे आपत्कालीन प्रणाली, जी एखाद्या साथीच्या किंवा आपत्तीच्या वेळी अधिकृतपणे लागू केली जाते. लॉक डाऊनच्या बाबतीत त्या भागातील लोकांना घरे सोडण्याची परवानगी नसते. या वेळेस कोणतीही व्यक्ती घरातून … Read more

करोना बाबत अफवांवर विश्­वास ठेवू नका

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ अहमदनगर : चिकनमध्­ये करोनाचा विषाणू ही अफवा आहे. यामध्­ये काहीही सत्­यता नाही. त्­यामुळे नागरिकांनी अशा अफवांवर विश्­वास ठेवू नये, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे. यासंदर्भात जनजागृती करण्यात येत असून, तालुका स्­तरावरील अधिकाऱ्यांमार्फतही ही माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली जात आहे. चीनमध्ये करोना विषाणूच्या बाधेमुळे अनेक नागरिकांचे बळी गेले. मात्र, विविध माध्यमांतून करोना … Read more

कॅन्सर असणाऱ्यांसाठी खुशखबर, सुरभि हॉस्पिटल मध्ये मिळणार मार्गदर्शन

अहमदनगर : सुरभि हॉस्पिटल तर्फे  कॅन्सर उपचार आणि तपासणी शिबीर डॉ तुषार मुळे मेडिकल आंकोलॉगिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली 23 फेब्रवारी रोजी 10 ते सायंकाळी 5 या वेळात  सुरभि हॉस्पिटल, गुलमोहोर रोड अहमदनगर येथे आयोजित करण्यात आले  आहे. या शिबिरामध्ये सर्व कॅन्सर संबंधी उपचार आणि मार्गदर्शन मिळणार आहे. या मुले जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोनो व्हायरसमुळे घाबरुन जाऊ नये

अहमदनगर :- जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनो विषाणूसंसर्गाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये आणि घाबरुन जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे. जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी यासंदर्भात जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. बापूसाहेब गाढे यांच्याकडून कोरोना विषाणू संसर्गासंदर्भातील जिल्ह्यातील वस्तुस्थिती जाणून घेतली. जिल्हा रुग्णालयात दि.६ फेब्रुवारी रोजी दाखल … Read more

कोरोनाच्या संशयितांना सक्तीने ताब्यात घेऊन इतरांपासून विभक्त ठेवणार !

लंडन : चीनमध्ये हाहाकार माजविणाऱ्या कोरोना विषाणूचा उद्रेक आपल्या देशाच्या सार्वजनिक आरोग्यासाठी गंभीर आणि घातक धोका असल्याची घोषणा सोमवारी ब्रिटनने केली. यासोबतच आजपासून कोरोनाच्या संशयित रुग्णांना सक्तीने ताब्यात घेऊन इतरांपासून विभक्त ठेवले जाईल, असेही ब्रिटनच्या आरोग्य विभागाने जाहीर केले. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी दोन रुग्णालयांची निवड करण्यात आली आहे. अलीकडच्या काळात चीनमधून आलेल्या … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरू

अहमदनगर :- चीनहून परतलेल्या आणखी २३ जणांची सोमवार (१० फेब्रुवारी) ला जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. कोरोनाच्या दक्षतेसाठी केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या निदर्शेनानुसार ही तपासणी करण्यात आली आहे.  दरम्यान, चीनहून गेल्या आठवड्यात देखील २७ जणांची प्राथमिक तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी एक जणाला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्याच्या घशातील लाळेचे … Read more

कोरोना व्हायरसच्या प्रसारासाठी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जबाबदार !

मॉस्को : कोरोना व्हायरसचा उगम चीनच्या हुबेई प्रांतात झाल्याचे शास्त्रज्ञांनी सप्रमाण सिद्ध केले आहे; पण रशियन माध्यमांनी या प्राणघातक विषाणूमागे पाश्चिमात्य राष्ट्रांचा विशेषत: अमेरिकेचा हात असल्याचा अजब दावा करून खळबळ उडवून दिली आहे. रशियाचे ‘चॅनल वन’ आपल्या ‘रेम्या’ (टाइम) नामक प्राइम टाइम कार्यक्रमात ‘कोरोना’वर चर्चा करत आहे. त्यात कोरोनाच्या प्रसारामागे अमेरिकेचा हात असल्याचा दावा केला … Read more

काेराेना विषाणूचा भस्मासुर …आतापर्यंत झाले इतके मृत्यू !

काेराेना विषाणूचा भस्मासुर वाढत चालल्याचे रविवारी दिसून आले. चीनमध्ये विषाणूमुळे मृतांची संख्या रविवारी ८११ वर पाेहाेचली. २००२-२००३ मध्ये सार्समुळे माेठ्या संख्येने लाेक दगावले हाेते. त्यापेक्षा जास्त संसर्ग हाेत असलेल्या काेराेनाची बाधा आता ३७ हजार लाेकांना झाली आहे. चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनकडून दरराेज काेराेनाविषयीची माहिती जाहीर केली जाते. रविवारी जाहीर केलेल्या माहितीनुसार चीनमधील ३१ प्रांतांत ३७ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना व्हायरसच्या संशयिताचे रिपोर्ट्स आले, आणि डॉक्टर म्हणाले…

अहमदनगर :- चीनमधून नगरमध्ये आलेल्या एका व्यक्तीस नगर शहरातील जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी दाखल केले होते. या व्यक्तीचा तपासणी अहवाल जिल्हा रुग्णालयास रविवारी मिळाला आहे.  या नागरिकाचे तपासणी अहवाल निगेटिव्ह असल्याचे रुग्णालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या नागरिकास  रविवारी दुपारनंतर जिल्हा रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. नेवासे तालुक्यातील त्या तरुणाच्या कोरोना व स्वाईन फ्लू आदी तपासण्या करण्यात … Read more

ताणतणाव चांगला की वाईट ?

नव्या जीवनशैलीनुसार प्रचंड स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेमुळे तणावाचं साम्राज्य दरक्षणी वाढत आहे. या तणावात फक्त लहान मुलं, शाळा-कॉलेज-एखादा नवीन अभ्यासक्रम शिकणारी मुलं, नोकरदार वर्ग नाही तर गृहिणीही गुरफटल्या आहेत. वाढती प्रलोभनं हेही तणाव वाढण्याचं महत्त्वाचं कारण ठरत आहे. अशा वाढत्या ताणतणावामुळे मन अस्थिर बनतं. समर्थ रामदास स्वामींनी मनाचं वर्णन ‘अचपळ मन माझे। धावरे धाव … Read more

अहमदनगर मध्ये कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण; जाणून घ्या कोरोना व्हायरसची लक्षणे कोणती, किती धोकादायक?

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण आढळला असल्याची माहिती समोर आली आहे. नेवासा येथे राहणारा एका २५ वर्षीय तरुणाला कोरोना व्हायरसची लागण झाली असण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी या तरुणाच्या रक्ताचे व घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविले आहेत. या व्हायरसविषयी सातत्याने येत असलेल्या बातम्यांमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण … Read more