Eknath Shinde : ब्रेकिंग! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व आमदार-खासदारांसह अयोध्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली..

Eknath Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या पक्षाच्या सर्व आमदार-खासदारांना घेऊन अयोध्येत जाणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. त्यानंतर आता त्यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख समोर आली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे येत्या 6 एप्रिलला अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे आमदार-खासदार अयोध्येत जावून … Read more

Raj Thackeray : शिवधनुष्य एकाला झेपले नाही, माहीत नाही दुसऱ्याला तरी झेपेल का? राज ठाकरे यांचा शिंदेवर निशाणा..

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवाजी पार्क मैदानावरून कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. यावेळी त्यांनी अनेकांवर निशाणा साधला. ते म्हणाले, शिवसेनेचे धनुष्यबाण हे शिवधनुष्य आहे. हे शिवधनुष्य बाळासाहेब ठाकरे सोडून इतर कुणालाही पेलणार नाही, मला माहित होते. एकाला झेपले नाही दुसऱ्याला बघा आता झेपते का? असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना … Read more

Ravindra Dhangekar : आमदार झाल्यानंतर धंगेकर करणार पत्नीची इच्छा पूर्ण, काय आहे नेमकी इच्छा..

Ravindra Dhangekar : पुण्यातील कसब्याच्या पोटनिवणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा दणदणीत विजय झाला. धंगेकरांचे आमदार होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. यानंतर त्यांनी आपल्या पत्नीचेही स्वप्न पूर्ण करणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे त्यांचे स्वप्न काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आमदार धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा त्या म्हणाल्या, पतीचे आमदार होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. तेच माझ्यासाठी मोठे … Read more

Raj Thackeray : शिवछत्रपतींची शपथ घेऊन सांगतो, मी उद्धव ठाकरेंना विचारले…, राज ठाकरेंनी सांगितला तो किस्सा

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मेळावा घेतला. यावेळी त्यांनी अनेक गोष्टी बोलून दाखवल्या आहेत. यामुळे याची चर्चा सुरू आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत देखील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. मला शिवसेनेतून बाजूला करायचा प्रयत्न सुरू होता, असे राज ठाकरे म्हणाले. तेव्हा मी उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो आणि म्हटले गाडीत बस आपल्याला बाहेर जायचे आहे. … Read more

Raju Shetty : राजू शेट्टींचे ठरलं! हातकणंगलेसह लोकसभेच्या पाच जागा स्वाभिमानी लढवणार…

Raju Shetty :  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी पूर्ण ताकदीने उतारणार असल्याचे सुतोवाच पक्षाकडून करण्यात आले आहे. राजू शेट्टी यांनी हातकणंगलेसह पाच ते सहा जागा स्वबळावर लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे आता राजू शेट्टी कोणासोबत युती करणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. राजू शेट्टी म्हणाले, … Read more

Sharad Pawar : राजकारणातील मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्ष दर्जा धोक्यात? निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय….

Sharad Pawar : एखाद्या राजकीय पक्षाला लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत चार किंवा त्याहून अधिक राज्यांमध्ये किमान सहा टक्के मते मिळाल्यास तो ‘राष्ट्रीय पक्ष’ म्हणून ओळखला जातो. असे असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘राष्ट्रीय पक्ष’ या दर्जाचा … Read more

Vinod Tawde : आता फडणवीस नाही तर विनोद तावडे असणार मुख्यमंत्री पदाचे उमेदवार? चर्चांना उधाण…

Vinod Tawde : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक बदल झाले आहेत. यामुळे कधी काय होईल हे कोणाला सांगता येत नाही. कधी कोणाचा पत्ता कट होईल आणि कधी कोणाची वर्णी लागेल, याबाबत काही सांगता येत नाही. आता केंद्रीय राजकारणातील भाजप नेते विनोद तावडे यांची कामगिरी पाहता ते पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय होतील. तसेच विनोद … Read more

Raj Thackeray : राज ठाकरे यांची मुंबईत सभा मात्र पुण्याचे चित्र बदलणार, मनसे नेत्यांनी आखली ‘अशी’ रणनीती…

Raj Thackeray : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुढीपाडव्याला मुंबईत सभा होत आहे. यासाठी मनसेकडून जोरदार तयारी सुरू आहे. यामध्ये राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सभेसाठी टिझर चांगलाच चर्चेत आला आहे. मुंबईत सभेची तयारी पूर्ण झाली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर मनसैनिक उपस्थित राहणार आहेत. असे असताना या सभेची पुण्यातच जास्त … Read more

Raj Thackeray : जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राज ठाकरे! आता मनसेचे थेट मुख्यमंत्री पदावर वक्तव्य..

Raj Thackeray : शिवाजी पार्कवर आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुढी पाडवा मेळाव्यानिमित्त जाहीर सभा होत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांमध्ये मोठे उलटफेर झाले आहेत. त्यातच सत्तासंघर्षाची सुप्रीम कोर्टातली सुनावणीही संपली आहे, ज्याचा निकाल कधीही येऊ शकतो. असे असताना सभेपुर्वी शिवाजी पार्क परिसरात मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आली … Read more

Rahul Kul : राहुल कुल यांच्या भीमा पाटस कारखान्याची श्वेतपत्रिका काढा, आता भाजप नेत्यानेच केली मोठी मागणी

Rahul Kul : गेल्या काही दिवसांपासून दौंड तालुक्यातील भीमा पाटस कारखाना चर्चेत आला आहे. या कारखाण्याचे अध्यक्ष भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी 500 कोटीचे आरोप केले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली होती. आता भीमा सहकारी साखर कारखान्याची आर्थिक स्थिती सभासदांसमोर येण्याकारिता श्वेतपत्रिका काढण्याची गरज आहे, अशी मागणी भाजप (BJP) किसान मोर्चाचे … Read more

Bhaskar Jadhav : भास्कर जाधव यांचा विधानभवनाला शेवटचा नमस्कार, पुन्हा येणार नाही? नेमकं काय घडलं..

Bhaskar Jadhav : सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात आमदार भास्कर जाधव हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या सोबत असलेल्या आमदारांना विधानसभेत थेट अंगावर घेतले आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ दिली आहे. ठाकरे यांची बाजू विधानसभेत जोरदारपणे जाधव यांनी मांडली आहे. असे असताना आज एक वेगळेच चित्र बघायला मिळाले. आज तेच विधानसभा सोडून जात असल्याने त्याची एकच … Read more

Ajit Pawar : अजितदादांनी मंत्री शंभूराज देसाई यांना मारली बुक्की, नेमकं काय झालं?

Ajit Pawar : सध्या राज्याचे अधिवेशन सुरू आहे. यावेळी विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आले. असे असताना राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे कोणत्या न कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवारांचा डोळा मारतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. अधिवेशन काळात त्यांचा एक वेगळाच रुबाब बघायला मिळतो. आता मंत्री शंभूराज देसाई यांना … Read more

Dada Bhuse : मंत्री दादा भुसेंनी घेतले शरद पवारांचे नाव, मग अख्खी राष्ट्रवादी दादा भुसेंवर तुटून पडली….

Dada Bhuse : राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना शरद पवारांचे नाव घेतले. यामुळे राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. यामुळे राष्ट्रवादीचे सर्व आमदार आक्रमक झाले. दादा भुसे म्हणाले की, महागद्दार संजय राऊत यांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. पण या प्रकरणाची चौकशी … Read more

Pankaja Munde : देशाची प्रधानमंत्री स्त्री झाली तुमची ताई होऊ शकत नाही का? पंकजाताईंचे थेट पंतप्रधान पदावर भाष्य

Pankaja Munde : भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे या गेल्या अनेक दिवसांपासून पक्षात नाराज असल्याचे सांगितले जाते. अनेकदा त्यांना डावलून दुसऱ्यांना पदे देण्यात आली आहेत. त्यांनी देखील अनेकदा याबाबत खदखद बोलून दाखवली आहे. असे असताना आता देखील त्यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या, देशाची प्रधानमंत्री स्त्री … Read more

Bachu Kadu : ५० खोके एकदम ओके! बच्चू कडूंना होम ग्राउंडवर मोठा धक्का! बाजार समितीत पॅनेलचा पराभव…

Bachu Kadu : प्रहारचे आमदार बच्चू कडू यांना मोठा धक्का बसला आहे. खरेदी विक्री संस्थेच्या निवडणूकीत त्यांच्या पॅनलचा पराभव पत्करावा लागला आहे. येथील चांदूरबाजार तालुका खरेदी-विक्री संस्थेच्या निवडणुकीत प्रहारचे फक्त तीन उमेदवार निवडून आल्याने बच्चू कडूंसाठी हा मोठा धक्का बसला आहे. यामुळे आगामी निवडणूक त्यांना जड जाण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष … Read more

Sanjay raut : राज्यात खळबळ! राहुल कुल यांच्यानंतर आता संजय राऊतांचे थेट कॅबिनेट मंत्र्यावर आरोप..

Sanjay raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी एका ट्वीटमध्ये मंत्री दादा भुसे यांचे थेट नाव घेऊन गिरणा अॅग्रो नावाने त्यांनी कोट्यवधी रूपयांचे शेअर्स जमावल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. एवढे शेअर्स घेऊनही वेबसाईटवर मात्र अत्यंत कमी रकमेचे शेअर्स दाखवल्याचा आरोपही राऊतांनी केला आहे. सध्या राऊत शिंदे – फडणवीस सरकारला घेरण्याचा … Read more

Aditya Thackeray : वरळीतून आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढणार? आता मनसेचा बडा नेता थेट मैदानात उतरण्याची शक्यता…

Aditya Thackeray : मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे हे आगामी विधानसभा निवडणुकीत थेट वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ते म्हणाले, राज ठाकरेंनी आदेश दिल्यास वरळी काय, मी गडचिरोलीतूनही निवडणूक लढवेन. यामुळे चर्चा सुरू झाली आहे. असे झाल्यास याचा फटका आदित्य ठाकरे यांना बसण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वा वरळीचे आमदार आदित्य … Read more

Rahul Gandhi : आता बेरोजगारांना दरमहा 3000 रुपये भत्ता मिळणार! निवडणूकीच्या आधी सर्वात मोठी घोषणा..

Rahul Gandhi : सध्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता यामध्ये कर्नाटकची विधानसभा निवडणूक होणार आहे. कर्नाटकच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून त्यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी केली आहे. असे असताना कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाला मोठ्या आशा असून त्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी जोरदार तयारी सुरू … Read more