Raj Thackeray : शिवछत्रपतींची शपथ घेऊन सांगतो, मी उद्धव ठाकरेंना विचारले…, राज ठाकरेंनी सांगितला तो किस्सा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मेळावा घेतला. यावेळी त्यांनी अनेक गोष्टी बोलून दाखवल्या आहेत. यामुळे याची चर्चा सुरू आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत देखील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. मला शिवसेनेतून बाजूला करायचा प्रयत्न सुरू होता, असे राज ठाकरे म्हणाले.

तेव्हा मी उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो आणि म्हटले गाडीत बस आपल्याला बाहेर जायचे आहे. आम्ही ओबेरॉय हॉटेलमध्ये गेलो. मी हे सर्व शिवछत्रपतींची शपथ घेऊन तुम्हाला सांगत आहे. मी उद्धव ठाकरेंना विचारले तुला काय हवंय? तुला पक्षप्रमुख व्हायचंय, हो. सत्ता आली तर मुख्यमंत्री व्हायचंय हो.

पण फक्त माझं काम काय मला सांग, असे राज ठाकरे म्हणाले. आता उद्धव ठाकरे काय उत्तर देणार हे लवकरच समजेल. या सभेकडे अनेकांचे लक्ष लागले होते. राज ठाकरे यांनी देखील अनेक गोष्टींना हात घातला.

त्यावेळी अनेक गोष्टी झाल्या, घरातूनही राजकारणातून झाल. आता उद्धव ठाकरे हे लोकांना सहानुभूती मिळवण्यासाठी सांगत फिरत आहेत. पण हे सांगण्याआधी जर तुम्ही काय राजकारण केलं हे सांगा, असेही ते म्हणाले.

मी काही ठरवलं नव्हतं, अनेकजण माझ्याकडे आले म्हणून मी पक्ष काढला. बाळासाहेबांशिवाय कोणालाही शिवधनुष्यबाण झेपणार नाही. एकाला झेपलं नाही आणि दुसऱ्या झेपेल की नाही माहित नाही, असेही ते म्हणाले.