Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Raj Thackeray : शिवधनुष्य एकाला झेपले नाही, माहीत नाही दुसऱ्याला तरी झेपेल का? राज ठाकरे यांचा शिंदेवर निशाणा..

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवाजी पार्क मैदानावरून कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. यावेळी त्यांनी अनेकांवर निशाणा साधला. ते म्हणाले, शिवसेनेचे धनुष्यबाण हे शिवधनुष्य आहे. हे शिवधनुष्य बाळासाहेब ठाकरे सोडून इतर कुणालाही पेलणार नाही, मला माहित होते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

एकाला झेपले नाही दुसऱ्याला बघा आता झेपते का? असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील टोला लगावला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मेळावा घेतला. यावेळी त्यांनी अनेक गोष्टी बोलून दाखवल्या आहेत. यामुळे याची चर्चा सुरू आहे.

त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत देखील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. मला शिवसेनेतून बाजूला करायचा प्रयत्न सुरू होता, असे राज ठाकरे म्हणाले. तेव्हा मी उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो आणि म्हटले गाडीत बस आपल्याला बाहेर जायचे आहे. आम्ही ओबेरॉय हॉटेलमध्ये गेलो.

मी हे सर्व शिवछत्रपतींची शपथ घेऊन तुम्हाला सांगत आहे. मी उद्धव ठाकरेंना विचारले तुला काय हवंय? तुला पक्षप्रमुख व्हायचंय, हो. सत्ता आली तर मुख्यमंत्री व्हायचंय हो. पण फक्त माझं काम काय मला सांग, असे राज ठाकरे म्हणाले.

त्यावेळी अनेक गोष्टी झाल्या, घरातूनही राजकारणातून झाल. आता उद्धव ठाकरे हे लोकांना सहानुभूती मिळवण्यासाठी सांगत फिरत आहेत. पण हे सांगण्याआधी जर तुम्ही काय राजकारण केलं हे सांगा, असेही ते म्हणाले.