देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जोडले हात

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- मेट्रो कारशेडच्या उभारणीसंदर्भात सुरू असलेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपांवरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना हात जोडून विनंती केली आहे. कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडबाबत सत्ताधारी आणि विरोधक आरोपप्रत्यारोप करीत आहेत. आज मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमावरून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यात त्यांनी मेट्रो कारशेडबाबत विरोधकांना चांगलच धारेवर धरलं. यावरून … Read more

युवकांसाठी मोदी सरकारची ‘ही’ योजना प्रशिक्षणासह देते कर्ज ; ‘असा’ घ्या फायदा

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- प्रधानमंत्री कौशल विकास योजनेंतर्गत सरकार दीड लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करुन देत आहे. 2015 मध्ये सुरू केलेल्या या योजनेंतर्गत युवकांना उद्योगांशी संबंधित प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण त्यांना रोजगार मिळविण्यात मदत करते. कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या या योजनेचे दोन टप्पे पूर्ण झाले असून तिसरा टप्पा सुरू होणार … Read more

पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या समन्वयातून विकासाला दिशा- आ.विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :-  योजनांच्या अंमलबजावणीत शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे वेगळेपण राज्यात दिसून येते.यासाठी गावपातळीवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संघटनेच्या माध्यमातून असलेला समन्वयच विकासाच्या प्रक्रियेला दिशा देणारा ठरत असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. कोव्हीडच्या संकटानंतर प्रथमच जनसेवा मंडळाच्या कार्यकर्त्याची सहविचार सभा माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या … Read more

अण्णा म्हणतात वय, सुरक्षा आणि करोनाची स्थिती लक्षात घेता आंदोलनात सहभाग घेता येणार नाही !

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :- दिल्लीच्या सीमेवर गेल्या 24 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरुच आहे. नव्या कृषी कायद्यांना या शेतकऱ्यांचा विरोध आहे. याबाबत सरकारकडून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, अद्याप सरकारला त्यावर यश मिळालेलं नाही. आज दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने रविवारी राळेगणसिद्धी येथे येऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये … Read more

कोरोनाचा धोका टळला नसल्याने स्वयंशिस्त पाळण्याचे मुख्यमंत्र्यांचे राज्यातील जनतेला आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :-जनतेचे सेवक म्हणून काम करतांना विकास प्रकल्पावरून वाद घालणे योग्य नसल्याचे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य आणि राष्ट्र विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र येऊन विकास कामांना गती दिली पाहिजे, विकासाचे दूरगामी परिणाम विचारात घेतले पाहिजेत असे स्पष्ट केले आज मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेला संबोधित केले त्यावेळी ते … Read more

अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होणार!! सरकारकडे केली ही मागणी

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत आंदोलन करणार. रामलीला किंवा जनतर मंतर मैदान उपलब्द करून देण्याची सरकारकडे मागणी केली आहे. नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात ज्येष्ठ  समाजसेवक अण्णा हजारे यांनी सहभागी व्हावे. यासाठी ११ जणांचे एक शिष्टमंडळ राळेगणसिद्धी येथे येऊन या आंदोलनात … Read more

आज दुपारी एक वाजता उद्धव ठाकरे साधणार जनतेशी संवाद

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी १ वाजता महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार आहेत.राज्यामधील कोरोनाची सध्याची परिस्थिती आणि अनलॉक संदर्भात मुख्यमंत्री बोलतील. अधिवेशन कार्यकाळात सरकारकडून मंजूर करण्यात आलेली कामे,कायदे आणि महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांवरही ते जनतेशी संवाद साधतील असं कळतंय. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अविभाज्य घटक असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा … Read more

मंत्री गडाखांच्या ताब्यातील या ग्रामपंचायतीची सगळीकडे चर्चा

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात सध्या सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. कार्यकर्त्यांसह पुढारी मंडळी निवडणुकीच्या कामात स्वतःला झोकून देत आहे. त्यातच जिल्ह्यातील काही ठिकाणी निवडणूक या बिनविरोध होत असल्याच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यामुळे देखील चांगलीच चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील चांदा ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला असून येत्या बुधवार दि. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महावितरणच्या विद्युत तारांना स्पर्श होऊन डंपर पेटला !

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :-   महावितरणच्या विद्युत तारांना स्पर्श झाल्याने शाॅर्टसर्किट होऊन हायवा डंपरने पेट घेतल्याने काहीकाळ चांगलीच खळबळ उडाली. या घटनेत डंपरच्या मागील भागाचे दीड लाख रुपये किमतीचे आठ टायर जळून खाक झाले. राहुरीचे वाहतूक पोलिस, तसेच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यास मदतकार्य केल्याने पुढील अनर्थ टळण्यास मदत झाली … Read more

कोरोना पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध करा

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :- काळे तसेच कोल्हे साखर कारखाने किंवा त्यांच्या हिताच्या संस्था निवडणूक बिनविरोध करतात. त्याचप्रमाणे सध्या होऊ घातलेला ग्रामपंचायती निवडणुकाही कोरोना पार्श्वभूमीवर त्यांनी बिनविरोध करून द्याव्यात, अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीनराव शिंदे यांनी केली. तालुक्यातील काही महत्त्वाच्या कार्यकर्त्यांबरोबर शिंदे यांची शनिवारी बैठक झाली.यावेळी शिंदे म्हणाले, कोल्हे-काळे-परजणे सर्व जण एकत्र येऊन साखर … Read more

काय सांगता ! शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी उचलले ‘हे’ पाऊल

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :-  कृषी कायद्याबाबत केंद्र सरकारविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी आज आपल्या ट्विटर हँडलवर एक ई-बुकलेट शेअर केले आहे. नवीन कृषी कायद्यांचा शेतकऱ्यांना कसा फायदा होईल हे या ई-बुकलेटमध्ये स्पष्ट केले आहे. त्यांनी सर्व लोकांना ते वाचून जास्तीत जास्त संख्येने शेअर करण्याचे आवाहन केले. केंद्र सरकारने कृषी … Read more

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी या नेत्याची लागली वर्णी

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :-  मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी विधान परिषदेचे आमदार भाई जगताप यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. दरम्यान काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जगतापांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. अध्यक्षपदी भाई जगताप तर चरणसिंह सपरा हे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहतील. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के.सी. वेणुगोपाल यांनी पत्रक काढत याबाबतची घोषणा केली … Read more

तरी देखील मास्क हाच रामबाण उपाय

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :- “लस आल्यानंतरही तोंडाला मास्क लावणं हा सर्वात मोठा रामबाण उपाय आहे. लस किती काळापर्यंत आपल्याला सुरक्षा देईल हे येणाऱ्या काळातच निश्चित होईल. त्यामुळे मास्क लावणं तर सर्वात सोप आहे. म्हणून मास्क लावणं आणि हाताच्या स्वच्छतेवर लक्ष देणं हे आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे. असे मत केंद्रीय आरोग्य मंत्री … Read more

शिवसेना हा अस्तित्त्व संपत चाललेला पक्ष भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :-  शिवसेना हा अस्तित्त्व संपत चाललेला पक्ष आहे असं म्हणत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर टीका केली आहे. तसंच संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेबद्दल विचारलं असता कोण संजय राऊत? असं विचारत त्यांनी उत्तर देण्यास नकार दिला आहे. सत्ता असा हा एक फेविकॉल आहे तो चिकटून बसतो. विविध … Read more

नेतृत्वाची कमान! पक्षाला राहुल गांधी यांची गरज

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत बैठक केली. या बैठकीत कॉंग्रेस नेत्यांनी राहुल गांधींनी पक्षाची सूत्रे स्वीकारली पाहिजेत, असे मत व्यक्त केले. या बैठकीत कॉंग्रेस पक्षाला बळकट करणे आणि नवा राष्ट्रीय अध्यक्ष निवडणे या विषयांवर चर्चा झाली आहे. कॉंग्रेस अध्यक्ष पदासाठी निवडणूक पुढच्या वर्षी जानेवारीच्या … Read more

30 कोटी नागरिकांना मिळणार कोरोनाची लस; पहा काय म्हणाले आरोग्यमंत्री

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- देशातल्या कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आज दिल्लीतही महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर pयांनी एक महत्वाची माहिती दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं की, लोकांना घाबरुन जाण्याची गरज नाही. स्वदेशी लस तयार करण्यात आली आहे आणि आमच्याकडे 30 कोटी लशीकरणाची क्षमता असेल. जीनोम सिक्वेंस आणि कोरोना … Read more

शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ वंचितचे आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- महाराष्ट्र सरकारने शेतकरी विरोधी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्यात दुरुस्ती करणारा अद्यादेश त्वरित काढावा. तसेच हिवाळी अधिवेशनात शेती मालाला हमीभाव मिळण्यासाठी तरतूद करावी यासह शेतकर्‍यांच्या इतर मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात धरणे आंदोलन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार हे आंदोलन … Read more

महसूलमंत्री म्हणतात गावपातळीवरील निवडणूका एकत्र लढणे अवघड

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- ग्रामपंचायतीचे राजकारण गावपातळीवर असल्याने या निवडणूका एकत्रितपणे लढणं अवघड आहे. प्रत्येकालाच आपला पक्ष वाढवण्याची इच्छा आणि जबाबदारी असते. त्यानुसार राज्यातील अधिकाधिक ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे वर्चस्व रहावे यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. विधान परिषदेच्या निवडणूकांमध्ये मिळालेल्या यशामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल वाढलेलं असून त्याचा सकारात्मक परिणाम ग्रामंपचायत निवडणूकांच्या माध्यमातून पहायला मिळेल असे … Read more