१ लीटर दुधात बादलीभर पाणी टाकून ८० विद्यार्थ्यांना पाजले 

वृत्तसंस्था :- उत्तरप्रदेशातील एका शाळेत माध्यान्ह भोजन कार्यक्रमांतर्गत एक लीटर दुधात बादलीभर पाणी टाकून ते ८० मुलांना देण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेत शिक्षकमित्राला निलंबित केले असून चौकशीचे आदेश दिले आहेत. सोनभद्र जिह्यातील कोटा ग्रामपंचायतींतर्गत येणाऱ्या बनवा प्राथमिक विद्यालयातील बुधवारची ही घटना आहे. या घटनेचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल … Read more

बालविवाह झालेल्या एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर बलात्कार ! 

कोटा : राजस्थानमध्ये बालविवाह झालेल्या एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर तिच्यासोबत लग्न करणाऱ्या युवकाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. हा नराधम फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. नववीच्या वर्गात शिकणारी ही १५ वर्षीय मुलगी बुधवारी शाळेतून परत येत होती. त्यावेळी एका व्हॅनमधून आलेल्या काही व्यक्तींनी तिचे अपहरण केले. या लोकांमध्ये पीडितेसोबत बालविवाह करणाऱ्या २० … Read more

धक्कादायक! महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार करून जाळले !

हैदराबाद :-  तेलंगणाची राजधानी असलेल्या हैदराबादमध्ये एका महिला पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार करून जाळून मारल्याची घटना घडली आहे. पशुवैद्य असलेली ही तरूणी बुधवारपासून बेपत्ता होती. गुरुवारी सकाळी तिचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत शादनगर परिसरामध्ये पोलिसांना अढळून आला. बुधवारी रात्री तिची गाडी शहराच्या एका शांत भागामध्ये पंक्चर झाली. तिने घरी फोन करून तशी कल्पनाही दिली. रात्री बराच उशीर … Read more

बिकट परिस्थितीत संघाला विजयी करू शकलो नाही

नवी दिल्ली : इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. त्या स्पर्धेला सुरुवात होण्याआधीपासूनच कर्णधार विराट कोहलीच्या संघाला विश्वचषक स्पर्धेचा संभाव्य विजेता म्हणून अनेकांनी पसंती दिली होती. पण स्पर्धेच्या अंतिम टप्प्यावरच भारतीय संघाला मायदेशी परतावे लागल्यामुळे असंख्य भारतीय क्रीडा शौकिनांना दु:ख झाले. आपला संघ नेहमीच विजयी ठरावा, असे … Read more

पती पत्नीला ट्रेनने चिरडले, सोळा वर्षांच्या प्रेमकहाणीचा दुर्दैवी अंत!

दिल्ली/ यमुना विहार – यमुना विहार कॉलनीत राहणाऱ्या नीरज कथुरिया आणि निशा कथुरिया यांच्या सोळा वर्षाच्या प्रेम कहाणीचा असा अंत होईल असं कोणालाही वाटलं नव्हत.  रात्री जवळजवळ अकरा वाजता दोघांमध्ये घरातील वाढत्या खर्चावरून वादविवाद झाला वाद इतका वाढला की निशा आपलं सामान घेऊन रेल्वे स्टेशनवर गेली. पत्नीची समजूत काढण्यासाठी पती सुद्धा आपल्या मित्राबरोबर तिच्यामागे रेल्वे … Read more

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

नवी दिल्ली : शासकीय विमानसेवा कंपनी एअर इंडियाचे खासगीकरण होणार नाही, अशी माहिती केंद्रीय नागरिक उड्डयन मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी नुकतीच राज्यसभेत दिली. तसेच कोणत्याही कर्मचाऱ्यांची नोकरकपात केली जाणार नसल्याचेही ते म्हणाले. कंपनीचे खासगीकरण करण्यापेक्षा कंपनी बंद केली जाईल. एअर इंडिया कंपनीतील वैमानिक खासगीकरण केले जाणार असल्याने एअरलाइन्स सोडत आहे का?, असा प्रश्न हरदीप … Read more

दिवसात फक्त 60 रुपये वाचवा, व्हाल 13 लाखांचे धनी

भारतात अनेक विमा कंपन्या असून त्यातील एलआयसी ही एक नामांकित कंपनी आहे. जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी नेहमी आकर्षक योजना बाजारात आणत असते. ज्यामुळे ग्राहकांना कमी पैशांमध्ये जास्त लाभ मिळतील. आता काय आहे हा प्लान जाणून घेऊयात. ‘जीवन लाभ 836’ असे या प्लॅनचे नाव असून जीवन लाभ 836 च्या प्लॅनमध्ये तुम्ही दिवसाला केलेली साठ … Read more

घडले असे काही की, सहा फेऱ्यानंतर वधू जागेवरच थांबली, म्हणाली…

उत्तर प्रदेश/ कानपूर –  येथील  एका लग्न सोहळ्यात एक विचित्र घटना घडली. लग्न चालू असतानाच नवरी ने लग्न करण्यास नकार दिला आणि यामुळे सर्वत्र शांतता पसरली.  नवरीने असे करण्याचे कारण म्हणजे तिचा होणारा पती. झाले असे कि लग्नात सप्तपदी चालू असताना सहा फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर नवरीला नवरदेवाच्या तोंडातून दारूचा वास येऊ लागला. तोंडातून येणारा दारूचा वास … Read more

भयानक घटना – अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने गर्भवती पत्नी, आई, आणि 3 चिमुकल्यांचेही गळे चिरले!

झारखंड- झारखंड राज्यातील कोडरमा जिल्ह्यात मनाला हादरा बसवणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका इसमाने आपल्या गर्भवती पत्नीसमवेत 3 तीन लहान मुलांची हत्या केली आहे.  या भयानक घटनेत एक सात वर्षीय भाची गंभीररीत्या जखमी झाली आहे मृतांमध्ये पत्नी, आई आणि तीन मुलांचा समावेश आहे.सूत्रांच्या माहितीनुसार ही घटना मंगळवारी रात्री उशीरा घडली. सध्या पोलिसांनी आरोपी गंगादास … Read more

मोदी सरकारच्या हाती राज्यघटनेची मूल्ये सुरक्षित नाहीत !

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे राज्यघटना सर्वोच्च असल्याचे सांगत आहेत; परंतु त्याच वेळी दुसरीकडे महाराष्ट्रात जे काही चालले आहे, यावरून या सरकारच्या हाती लोकशाही, राज्यघटना सुरक्षित नसल्याचे स्पष्ट होते, असा घणाघात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केला. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवरून काँग्रेसच्या नेतृत्वाखाली मंगळवारी संविधान दिनाच्या औचित्याने संसद परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर मोदी … Read more

आयुर्विम्याच्या नियमांमध्ये १ डिसेंबरपासून होणार मोठे बदल !

नवी दिल्ली : आयुर्विम्याच्या नियमांमध्ये १ डिसेंबरपासून मोठे बदल होणार आहेत. इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ॲथॉरिटी ऑफ इंडिया (इरडा) ही नवीन नियम लागू करणार आहे. नव्या नियमांनुसार विम्याचा हप्ता वाढण्याची शक्यता आहे, तर गॅरेंटीड रिटर्न काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. आयडीबीआय फेडरल लाईफ इन्शुरन्सचे सीएमओ कार्तिक रमन यांनी सांगितले की, जरी हप्ता वाढला तरीही … Read more

मुद्रा योजनेची परतफेड होत नसल्याने आरबीआय चिंतेत

मुंबई : केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करून लघु उद्योजकांसाठी ‘मुद्रा कर्ज योजना’ आणली. देशभरातील अनेकांनी या योजनेचा लाभ घेत मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतले, परंतु आता कर्जाची परतफेड होत नसल्याने यावर भारतीय रिझर्व्ह बँकेने चिंता व्यक्त केली आहे. भारतीय लघु उद्योग विकास बँके (सिडबी)च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सूक्ष्म वित्तवरील कार्यक्रमात भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युप्टी गव्हर्नर … Read more

दिल्लीतून राजीनाम्याचे निर्देश

नवी दिल्ली : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचे निर्देश दिल्लीतून आल्याची सूत्रांची माहिती आहे. महाराष्ट्रातील सत्तानाट्यात भाजपाची सूत्रे हलविणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर तत्काळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा केली. न्यायालयाने फडणवीस सरकारला बुधवारी विधानसभेत बहुमत चाचणीला सामोरे जाण्यास सांगितले होते. तसेच विश्वासदर्शक ठरावावर गुप्तऐवजी उघड मतदान घेण्यात यावे आणि … Read more

2020 मध्ये येणारे हे पाच चित्रपट इतिहास घडवणार, शाहरुखचा सनकी, तर सलमानचा…

१. इंडियन 2 : शंकर यांचा पुढचा चित्रपट ज्यांनी रोबोट आणि 2.0 सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. इंडियन 2 या चित्रपटाचे शूटिंग जोरात चालू आहे. या चित्रपटामध्ये कमल हसन, काजल अग्रवाल, रकुल प्रीत सिंग, विद्युत जामवाल आणि सिद्धार्थ यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचे बजेट 200 करोड पेक्षा अधिक आहे आणि हा चित्रपट 2020 मध्ये … Read more

प्रेमासाठी वाट्टेल ते…पाकिस्तान सोडून आली भारतात, लग्नही केलं, नंतर….

असे म्हटले जाते की प्रेमासाठी कोणतीही सीमा नसते आणि असेच काहीसे घडले कराची येथील एका मुलीसोबत, तिला मुंबईमधील एका मुलासोबत प्रेम झाले. सोशल मीडियावर सारा हुसेन ची ही सुंदर लव स्टोरी खूपच व्हायरल झाली. ह्यूमन ऑफ बॉम्बे ने आपल्या फेसबुक पेजवर त्यांची सुंदर लव स्टोरी शेअर केली आहे. त्यांनी सांगितले की कशाप्रकारे कराचीची मुलगी मुंबईतील … Read more

Seventh Finance Commission : पगार वाढीची वाट पाहणाऱ्यांसाठी खुशखबर, या कर्मचाऱ्यांना बढती बरोबरच मिळणार 21 हजार रुपयांचे इन्क्रीमेंट

दिल्ली –  सातव्या वेतन आयोगानुसार पगार वाढीची वाट बघणार्‍या 5000000 केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रतिक्षा अखेर संपणार आहे. केंद्रातील मोदी सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर देणार आहे. ऐकण्यात येत आहे की याच आठवड्यात ही भेट कर्मचाऱ्यांना मिळू शकते. पगारात होणार वाढ सूत्रांच्या माहितीनूसार नोव्हेंबरच्या शेवटच्या दिवसात केंद्रीय कर्मचार्‍यांच्या पगारवाढीबाबत मोदी सरकार घोषणा करू शकते. सूत्रांच्या माहितीनुसार … Read more

भगतसिंह कोशारींची होणार हकालपट्टी, कलराज मिश्र होणार नवे राज्यपाल?

दिल्ली – महाराष्ट्रात घडणाऱ्या राजकीय नाट्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून केंद्र सरकार राज्यपाल भगतसिंह कोशारी यांची बदली करू शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांची कोशारी यांच्या जागी नियुक्ती होऊ शकते. मिश्र हे हिमाचल प्रदेश येथून स्थानांतरित होऊन 9 सप्टेंबर रोजी राजस्थानचे राज्यपाल झाले होते. उत्तराखंडचे सीएम आणि राज्यसभा सदस्य राहिलेले कोशारी यांच्यावर महाराष्ट्राच्या … Read more

ट्रॅक्टर ट्रॉलीस दुचाकीची धडक, तीन सख्ख्या भावांनी गमावले प्राण

फतेहाबाद –  सोमवारी रात्री उशिरा खुनान गावाजवळ झालेल्या अपघातात तीन सख्ख्या भावांचा मृत्यू झालाय. या मृत भावांमध्ये काला सिंह वय 32,दीपक वय 21,आणि जिंदा सिंग वय 23 यांचा समावेश आहे हे तीनही भाऊ हासपूर गाव येथील रहिवासी आहेत. ते रात्री उशिरा बरवाला गावाजवळून वीट भट्टी पासून माघारी येत होते. घरापासून केवळ नऊ किलोमीटरच्या अंतरावर खुनान … Read more