सबरीमाला मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या महिलेच्या डोळ्यावर मिरची स्प्रेने हल्ला!

केरळ – सबरीमाला येथील भगवान अयप्पा मंदिराच्या दर्शनासाठी जाणाऱ्या एका महिलेवर हिंदू संघटनेच्या एका सदस्याने हल्ला केला. मागील वर्षी उच्च न्यायालयाने सगळ्या महिलांसाठी मंदिरात दर्शन देण्याची परवानगी दिली होती. त्यावेळी महिला अधिकार कार्यकर्ता तृप्ती देसाई यांच्यासोबत बिंदू अम्मीनी या सुद्धा होत्या बिंदू अम्मीनी यांच्यावर पोलीस आयुक्तालयाच्या बाहेर हिंदू संघटनेच्या एका कार्यकर्त्याने मिरची स्प्रे ने हल्ला … Read more

ती जेव्हा – जेव्हा शेतात जायची तेव्हा-तेव्हा तिच्यावर बलात्कार व्हायचा…!

जबलपूर – मध्यप्रदेशातील जबलपूर येथील कूंडम तालुक्यातील रहिवासी असलेली महिला जेव्हा जेव्हा शेतामध्ये कामासाठी जात असत तेव्हा तिच्यावर मानक उर्फ मनु नामक व्यक्ती तेथे येऊन तिच्यावर बलात्कार करत होता. जवळ जवळ मागील अकरा महिन्यांपासून त्रस्त असलेल्या महिलेने अखेर सोमवारी पोलीस स्टेशनला जाऊन त्याच्या विरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी मानक उर्फ मन्नू सय्याम याच्या विरोधात तक्रार नोंदवून … Read more

पंतप्रधानांसोबत राहणाऱ्या नातेवाईकांना मिळणार एस पी जी सुरक्षा, लोकसभेत झाले ‘हे’ तीन ठराव मंजूर

नवी दिल्ली –  लोकसभेमध्ये महाराष्ट्रात चालू असलेल्या घडामोडींवर मोठ्या प्रमाणात वाद झाल्यानंतर एस पी जी संशोधन बिल 2019 सादर केले गेले.या बिलानुसार आता पंतप्रधानांसोबत फक्त त्यांना एसपीजी सुरक्षा देण्यात येईल जे पंतप्रधानांच्या जवळचे नातेवाईक असतील आणि जे पंतप्रधानांसोबत त्यांच्या सरकारी निवासस्थानी राहत असतील. याव्यतिरिक्त पूर्व पंतप्रधानांना पद सोडल्यानंतर केवळ पाच वर्षांपर्यंत एसपीजी सुरक्षा मिळणार आहे. … Read more

पेट्रोलच्या दराने गाठला वर्षातील उच्चांक

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने देशात इंधनाच्या दराचा देखील भडका होऊ लागला आहे. दिल्ली, कोलकाता आणि मुंबईमध्ये प्रतिलिटर पेट्रोलचा दर १२ पैशांनी, तर चेन्नईमध्ये १३ पैशांनी वाढवला आहे. परिणामी मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ८०.३२ रुपयांवर पोहोचले आहे. डिझेलच्या किमतीमध्ये मात्र काहीही बदल झालेला नाही. आखाती राष्ट्रांमध्येही त्याचा फटका बसत … Read more

पैशासाठी माजी राज्यमंत्र्यांच्या मुलीचा छळ

सोलापूर : तुझे वडील आमदार होते, राज्यमंत्री होते, साधी कार सुध्दा दिली नाही, म्हणून माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांची मुलगी पूजा कांबळे यांचा पैशासाठी मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला आहे. याप्रकरणी नांदेड येथील पती, सासू – सासऱ्यावर सदर बझार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूजा कांबळे (वय २३, रा. शिक्षक सोसायटी, दक्षिण … Read more

…म्हणून नरेंद्र मोदी म्हणाले ‘माझा राजकारणात येण्याचा विचारही नव्हता ! 

नवी दिल्ली : ‘माझा राजकारणात येण्याचा विचारही नव्हता; पण आज मी राजकारणाचा एक भाग असून, जनतेची कामे करण्यासाठी मी माझे सर्वश्रेष्ठ प्रयत्न करत आहे,’ असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या मासिक ‘मन की बात’ कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’द्वारे ‘एनसीसी’ कॅडेट्सशी संवाद साधला. त्यात एका विद्याथ्र्याने त्यांना … Read more

एक कोटीच्या बनावट नोटांसह ५ जणांना अटक

सूरत : गुजरात राज्यातील विविध भागातून १ कोटीहून अधिक रुपयांच्या बनावट नोटा जप्त करत ५ जणांना अटक केल्याची माहिती रविवारी सूरत गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली. बनावट नोटांसंदर्भात सूरत गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. शनिवारी सूरत जिल्ह्यातील काम्रेज भागातून प्रतीक चोडवाडियाकडून २ हजार रुपयांच्या २०३ नोटा जप्त करण्यात आल्या. त्याची चौकशी केल्यानंतर … Read more

कैद्याची गळफास लावून आत्महत्या

इंदौर : मध्य प्रदेशच्या इंदौर शासकीय रुग्णालयात एका हत्या ेप्रकरणातील विचाराधीन कैद्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली. शरीरावरील जखमांवर बांधलेली पट्टी काढून त्या पट्टीच्या मदतीने या कैद्याने गळफास घेतल्याचे यावेळी पोलिसांनी सांगितले. रामकृष्ण कतिया (३५) नावाच्या कैद्याविरोधात हदरा येथील स्थानिक न्यायालयात हत्येचा खटला सुरू होता. न्यायालयाने कोठडी ठोठावल्यामुळे त्याला जिल्हा कार्यालयात … Read more

माजी मुख्यमंत्री जोशी यांचे निधन

भोपाळ: मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते कैलाश जोशी यांचे रविवारी एका खासगी रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ९० वर्षे होते. रविवारी सकाळी भोपाळ येथील बन्सल रुग्णालयात वडिलांचे निधन झाल्याचे स्पष्ट करत हाटपिपल्या या त्यांच्या मूळ गावी सोमवारी सकाळी अंत्यविधी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांचे पुत्र व राज्याचे माजी मंत्री … Read more

पंतप्रधानांकडून जनतेचे आभार 

नवी दिल्ली : अयोध्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल ऐतिहासिक असून त्यानंतर धैर्य व परिपक्वता दाखविणे स्वागतार्ह बाब आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नियोजित ‘मन की बात’ या कार्यक्रमातून जनतेचे आभार व्यक्त केले आहेत. न्यायालयाचा निकाल देशाने सहजतेने स्वीकारला. आता देश नवी आकांक्षा व अपेक्षेसोबत दमदारपणे वाटचाल करणार आहे, असा विश्वास त्यांनी … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात प्रचंड विकास !

रांची : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात राज्यात प्रचंड विकास कामे झाली आहेत, असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी केला आहे. विकास कामांच्या जोरावरच झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमत प्राप्त करेल, असा दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. झारखंडची राजधानी रांची येथे पीटीआयला दिलेल्या विशेष मुलाखतीत … Read more

अयोध्येत भव्य राम मंदिर बांधण्यापासून रोखू शकत नाही !

रांची : ‘जगातील कोणतीही शक्ती अयोध्येत भव्य राम मंदिर बांधण्यापासून रोखू शकत नाही’, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी झारखंडच्या पंडू येथे आयोजित एका प्रचारसभेत बोलताना केले. फ्रान्सकडून खरेदी करण्यात आलेली राफेल विमाने सीमेपलीकडील अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात सक्षम असल्याचेही ते यावेळी म्हणाले. ‘सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येत भगवान श्री रामाचे मंदिर बांधण्याचा मार्ग … Read more

प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी !

रांची :- राज्यात महाआघाडीचे सरकार आल्यास प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी दिली जाईल, असे आश्वासन काँग्रेस पक्षाने झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी जारी केलेल्या जाहीरनाम्यात दिले आहे. झारखंडचे काँग्रेसचे प्रभारी आर. पी. एन. सिंह यांनी रविवारी येथे जाहीरनामा जारी करताना सांगितले की, जर राज्यात झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील काँग्रेस, झामुमो आणि राजद आघाडीचे सरकार स्थापन झाले … Read more

माजी मुख्यमंत्र्यांकडे सापडल्या २६ लाखांच्या जुन्या नोटा

इम्फाळ : मणिपूरचे माजी मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह यांच्या घरावर केंद्रीय तपास संस्थेने (सीबीआय) टाकलेल्या धाडीत तीन वर्षांपूर्वी चलनातून बाद करण्यात आलेल्या २६.४९ लाख रुपयांच्या जुन्या नोटा सापडल्या आहेत. माजी मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह आणि इतर लोकांच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातच सिंह यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकलेला आहे. याबाबतच्या माहितीनुसार, मणिपूरमधील … Read more

सेना-काँग्रेस-राष्ट्रवादीने रस्त्यावर उतरावे

भोपाळ : भाजपा आणि राष्ट्रवादीच्या बंडखोरांनी आश्चर्यकारकपणे हातमिळवणी करून सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेनेने मुंबईतील आपली ताकद दाखवून द्यावी. प्रसंगी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी संयुक्तरीत्या रस्त्यावर उतरून लढा द्यावा. कारण या पक्षांपुढे आता अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी शनिवारी दिली आहे. भोपाळ येथे पत्रकारांशी बोलताना दिग्विजय सिंह म्हणाले … Read more

शरद पवारांनी ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’त सामील व्हावे

पाटणा : महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरून राजकारणाचा फड चांगलाच रंगला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्रातील सत्तारूढ ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’त (रालोआ) सामील व्हावे, अशी विनंती केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी केली आहे. पवार रालोआत आल्यास त्यांना महत्त्वाचे पद दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय वळण देण्यासाठी शिवसेना जबाबदार असून भाजपाने सेनेला चांगलाच … Read more

खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात केली ही मागणी 

अहमदनगर : राज्यात अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले असून, ओल्या दुष्काळाने संकटात सापडलेल्या राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने प्रति हेक्टर ५० हजार रूपयांची मदत नूकसान भरपाई म्हणून द्यावी, अशी मागणी खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केली. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी संसदेत केंद्र सरकारच्या मदतीबाबतच्या अधिसूचनेवर सुरू असलेल्या चर्चेत सहभाग घेवून त्यांनी … Read more

या रस्त्यावर पडला नोटांचा पाऊस !

कोलकाता : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील एका रस्त्यावर अचानक दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ५०० आणि २००० रुपयांच्या नोटांचा पाऊस पडण्यास सुरुवात झाली. अक्षरक्ष: रस्त्यावर पैशाची चादर पसरल्यासारखे दृश्य दिसत होते. रस्त्यावर कोसळत असलेल्या या नोटा गोळा करण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली. ज्याच्या हाताला जितक्या नोटा मिळाल्या, त्या घेऊन लोक पोबारा करत होते. कोलकाता येथील … Read more