डॉ.मनमोहन सिंगांना पाकचे निमंत्रण

इस्लामाबाद : जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याच्या मुद्यावरून ‘भारत-पाक’मधील तणाव टोकाला पोहोचल्याच्या पार्श्वभूमीवर पाकने आपल्या हद्दीतील करतारपूर कॉरिडोरचे उद्घाटन करण्यासाठी भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना निमंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ९ नोव्हेंबर रोजी या कॉरिडोरचे उद्घाटन होणार आहे. दरम्यान, मनमोहन या कार्यक्रमाला जाणार किंवा नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण, सूत्रांनी … Read more

लालूंची सून म्हणतेय सासू व नणंदेने घराबाहेर काढले !

पाटणा : सासू व नणंदेने मिळून आपल्याला घराबाहेर काढल्याचा आरोप राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालुप्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यादव यांची पत्नी ऐश्वर्याकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी ऐश्वर्याने महिला हेल्पलाइनकडे तक्रार दिल्याची माहिती रविवारी अधिकृत सूत्रांनी दिली. माजी मुख्यमंत्री राबडी देवी व मोठी नणंद राज्यसभा खासदार मीसा भारती या दोघांनी आपल्याला घरातून बाहेर काढल्याचे … Read more

देशावर ८८ लाख कोटींचे कर्ज असूनही सर्वकाही चांगले कसे?

नवी दिल्ली : भारताच्या डोक्यावर तब्बल ८८ लाख कोटी रुपयांचे डोंगराएवढे कर्ज आहे. तरीही सर्वकाही चांगले कसे आहे? असा परिस्थितिसापेक्ष सवाल काँग्रेसने शनिवारी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील भारतीयांना संबोधित करताना, भारतात सर्वकाही अलबेल असल्याचा दावा केला होता. त्यावर आर्थिक आकडेवारीचा हवाला देत काँग्रेसने तोंडसूख घेतले आहे. नवी दिल्ली येथे पत्रकारांशी वार्तालाप करताना … Read more

नासा विक्रमचा माग काढण्याचा प्रयत्न करणार

गत ७ तारखेला विक्रमची चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील सॉफ्ट लँडिंग फसली होती. तेव्हापासून त्याच्याशी कोणताही संपर्क झाला नव्हता. नासाच्या चंद्राभोवती घिरट्या घालणाऱ्या ‘लुनार रिकॉनिसन्स ऑर्बिटर’ने (एलआरओ) गत १७ तारखेला या लँडिंग स्थळाची काही छायाचित्रे काढली होती. त्यात विक्रमच्या लँडिंगचे अचूक स्थान किंवा त्याच्या स्थितीची कोणतीच माहिती मिळाली नाही. ‘विक्रमची चंद्रावर हार्ड लँडिंग झाली असून, अंतराळ यानाच्या … Read more

हा घ्या पुरावा…भारतात येणारा कांदा पाकीस्तानचाच!

ठाणे : एकीकडे पाकिस्तानवर टीका करून महाराष्ट्राची निवडणूक लढवणाऱ्या भाजपा सरकारने कांद्याची आयात पाकिस्तानातूनच केली आहे.  या संदर्भातील पुरावाच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून दिला आहे. त्यांनी दिलेल्या पुराव्यामुळे भाजपा सरकार तोंडघशी पडले आहे. ३७० कलम, बालाकोट असे मुद्दे भाजपाच्या प्रचारामध्ये दिसत असले, तरी भारताने चक्क पाकिस्तानातून कांदा आयात करण्याचे … Read more

उघड्यावर शौच केल्याने दोन दलित चिमुरड्या बहिण-भावाची हत्या

शिवपुरी : पंचायतीसमोर उघड्यावर शौच केल्यामुळे दोघांनी दोन लहान मुलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी मध्यप्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यात घडली. दोन व्यक्तींनी १२ वर्षीय रोशनी वाल्मिक व १० वर्षीय अविनाश वाल्मिकला शौचास बसण्यावरून बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे दोन्ही लेकरांचा जीव गेला. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या लेकरांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु डॉक्टरांनी दोघांना मृत … Read more

गांधीजींचे विचार आजही प्रासंगिक, पंतप्रधान मोदी, यूएन प्रमुखांचे प्रतिपादन

न्यूयॉर्क/ नवी दिल्ली : हवामान बदल, दहशतवाद आणि भ्रष्टाचार यासारख्या समस्यांचा सामना करत असलेल्या आजच्या जगातदेखील राष्ट्रपिता महात्मा गांधींचे सिद्धांत मार्गदर्शक आहेत. त्यांचे विचार आजही कालसुसंगत आहेत, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी व संयुक्त राष्ट्र अर्थात यूएने प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी गांधींचे महत्त्व अधोरेखित केले.  यावेळी यूएन मुख्यालयातील गांधी सौर पार्क आणि गांधी शांतता उद्यानाचे … Read more

अमेरिकेतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कौतुकाचा हा गजर

ह्युस्टन : ‘मोदी… मोदी…’चा गजर रविवारी अमेरिकेतही निनादला. संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या ह्यूस्टनमधील ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कौतुकाचा हा गजर झाला. या कार्यक्रमाला ५० हजार मूळ भारतीय अमेरिकन नागरिकांसह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अनेक मेयर तसेच सिनेटर उपस्थित होते. या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी एकमेकांची प्रशंसा करतानाच द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याचे … Read more

दोन्ही राज्यांतील जनता भाजपाला सत्तेतून बेदखल करण्यासाठी उतावीळ

नवी दिल्ली : काँग्रेसने शनिवारी महाराष्ट्र व हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाचे स्वागत करताना या दोन्ही राज्यांतील जनता भाजपाला सत्तेतून बेदखल करण्यासाठी उतावीळ असल्याचा दावा केला. ‘या निवडणुकीत काँग्रेस शेतकरी समस्या, बेरोजगारी, आर्थिक मंदी आदी लोकांचे प्रश्न घेऊन मतदारांना सामोरे जाईल,’ असे काँग्रेसने म्हटले आहे. निवडणूक आयोगाने शनिवारी महाराष्ट्र व हरयाणा विधानसभेच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. … Read more

नोकरी शोधणार्यांसाठी आनंदाची बातमी, ह्या कंपनीत मिळणार ७ हजार जणांना नोकरी!

नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी कोळसा उत्पादक कंपनी असलेली कोल इंडिया ही सरकारी कंपनी वर्तमान आर्थिक वर्षात ७ हजार जणांना रोजगार देणार आहे. यंदा ही कंपनी तब्बल १७ टक्के अधिक रोजगार उपलब्ध करून देणार आहे. दरवर्षी कंपनी सुमारे ६ हजार जणांना नोकरी देते. कोल इंडियाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या आधुनिक, स्वयंचलित आणि पर्यावरणानुकूल … Read more

केजरीवाल शेतकऱ्यांना देणार १०० कोटींची भेट!

दिल्लीत आगामी फेब्रुवारी महिन्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. या अनुषंगाने आम आदमी पक्ष मतदारांना आकर्षित करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. मोफत मेट्रो, मोफत वीजनंतर आता केजरीवाल सरकार ‘मुख्यमंत्री किसान मित्र योजना’ लागू करण्यावर विचार करत आहे. ‘मुख्यमंत्री किसान मित्र योजना’ लागू करण्यासंदर्भात एक कॅबिनेट नोट तयार केली जात असून लवकरच ती सरकारकडे पाठवली जाणार आहे. … Read more

या एका चुकीमुळे सनी देओल, करिश्मा कपूर गोत्यात!

जयपूर : जवळपास २० वर्षांपूर्वी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान रेल्वेची चेन खेचल्याप्रकरणी अभिनेता व खासदार सनी देओल आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्यावर रेल्वे न्यायालयाकडून आरोप निश्चित करण्यात आले आहेत. परंतु दोघांनीही रेल्वेच्या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. १९९७ मध्ये ‘बजरंग’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना ही घटना घडली होती. अभिनयाच्या क्षेत्रातून राजकारणात आलेल्या सनी देओल आणि करिश्मा … Read more

देशभरात ई-सिगारेटवर बंदी!

दिल्ली : आरोग्यास हानिकारक आहे की नाही याबाबत वाद असलेल्या ई-सिगारेटवर बंदी घालण्याचा निर्णय अखेर केंद्र सरकारने बुधवारी जाहीर केला. त्यानुसार देशात ई-सिगारेटचे उत्पादन व विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी बुधवरी पत्रकार परिषदेत या निर्णयाची घोषणा केली. तसेच धूम्रपानाची समस्या सोडवण्यात ई-सिगारेट अपयशी ठरले असून, शाळकरी मुलांमध्ये त्याचे वेड … Read more

एलईडी टीव्ही होणार स्वस्त !

नवी दिल्ली : देशांतर्गत टीव्ही उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने एलईडी टीव्ही उत्पादनात वापरात येणाऱ्या ओपन सेल टीव्ही पॅनेलवरील ५ टक्के आयात शुल्क हटवले आहे. यामुळे ओपन सेल टीव्ही पॅनेल आयातीवर यापुढे कोणतेही आयात शुल्क भरावे लागणार नाही. अर्थमंर्त्यांनी मंगळवारी रात्री उशिरा अधिसूचनेच्या माध्यमातून हे शुल्क हटवले आहे.. ओपन सेल टीव्ही पॅनेलचा उपयोग एलईडी आणि … Read more

भाजप नेत्याची जीभ घसरली, भर सभेत म्हणाले काँग्रेसचे आमदार ‘हिजडे’!

बंगळुरू : कर्नाटकात येदियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री असलेले के.एस. ईश्वरप्पा यांनी रविवारी एका जनसभेत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी काँग्रेसच्या आमदारांची वर्तणूक ही अगदी हिजड्यासारखी असल्याचे म्हटले आहे. या वक्तव्यानंतर ते आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या जनसभेत बोलताना ईश्वरप्पा म्हणाले, ‘आमचे सरकार सत्तेत येण्यापूर्वी काँग्रेसचे काही आमदार … Read more

एक किलो प्लास्टिक द्या आणि मोफत जेवण मिळवा

छत्तीसगडच्या सरगुजा (अंबिकापूर) मध्ये प्लास्टिक कचरा मुक्त करण्यासाठी वेगळी योजना गांधी जयंतीपासून सुरू होत आहे. या अंतर्गत प्लास्टिक कचरा वेचणाऱ्यांना जेवण-नाष्ट्याची व्यवस्था केली आहे. यासाठी ‘गार्बेज कॅफे’ही बनवला जात आहे. अंबिकापूरच्या महापालिकेने शहर स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिकमुक्त बनवण्यासाठी या योजनेची एक महिन्यापूर्वी घोषणा केली होती. या योजनेचा उद्देश शहराला संपूर्णपणे प्लास्टिकमुक्त बनवणे हा आहे. ही … Read more

या प्रेमीयुगुलाने लग्नाच्या पत्रिकेवर लिहिली अजब सूचना…वाचून तुम्ही म्हणाल हे तर?

नवी दिल्ली : आजकाल नागरिक चर्चेत येण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. चर्चेत येण्यासाठी एका प्रेमीयुगुलाने लग्नाच्या पत्रिकेवर अजब सूचना लिहिली असून सोशल मीडियावर ही पत्रिका खूप व्हायरल होत आहे. सोशल डिस्कशन वेबसाइट रेडड्ीटवर ही पत्रिका शेअर केली आहे.मात्र, या पत्रिकेवर कुणाचेही नाव देण्यात आलेले नाही. पाहुण्यांनी लग्नात येण्याची अथवा न येण्याची माहिती योग्य वेळी दिली … Read more

संतापजनक: एक लाखासाठी आईने केली मुलीची विक्री

दिल्ली : दिल्लीच्या बवानामधून एका १५ वर्षीय मुलीची सुटका करण्यात आली आहे. मुलीच्या आईने मागील आठवड्यात मुलीला विकले होते. दिल्ली महिला आयोगाने रविवारी ही माहिती दिली. आयोगानुसार, सुटका करण्यात आलेल्या मुलीने सांगितले की, तिच्या आईने एक वर्षाच्या भावालाही गेल्या महिन्यात तस्करांकडे सोपवून त्या मोबदल्यात पैसे घेतले. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या आईने १५ सप्टेंबरला तिला तिच्या … Read more