डोकेदुखी थांबण्यासाठी तिने खाल्ल्या 15 गोळ्या पण झाले असे काही कि गमविला जीव…

बंगलूरु : डोकेदुखी असह्य झाल्याने ती शमवण्यासाठी १५ गोळ्या खाल्ल्याने गृहीणीचा मृत्यू झाल्याची घटना बंगलूरुत घडली आहे. या गोळ्यांमुळे तीने दोन दिवस मृत्यूशी झुंज देत होती. मुनाप्पा हा पत्नी सुमन्न्मा आणि मुलीसोबत अनेकल पोलिस ठाण्याच्या हद्दीत रहातो. सुमन्न्माला डोकेदुखीचा त्रास आहे. तिच्यावर उपचार सुरु होेते. डोकेदुखी असल्यास वेदनाशमक गोळ्या तिला डॉक्टरने दिल्या होत्या. चार दिवसांपूर्वी … Read more

लॅण्डरशी संपर्क साधण्यासाठी इस्त्रोच्या हाती आता फक्त दहा दिवस…

वृत्तसंस्था ;- चांद्रयान-२ मोहिमेच्या अगदी अंतिम टप्प्याच्या घटनांची इस्त्रो अगदी बारकाईने माहिती घेत आहे. इस्त्रोने विक्रमशी संपर्क तुटला त्याच रात्री चांद्रभूमीपासून २.१ किलोमीटरवर असेपर्यंत इस्त्रोच्या नियंत्रणाखाली लॅण्डर होते. शनिवारी पहाटे १.४० ला लॅण्डरने ठरवून दिलेल्या मार्गाने क्रमाक्रमाने वेग कमी करत प्रवास सुरू ठेवला. चांद्रभूमीवर उतरण्यासाठी लॅण्डरने योग्य ती दिशाही पकडली. दक्षिण गोलार्धाच्या दिशेने मार्गक्रमण सुरू … Read more

आता याला काय म्हणाव ? लुंगीवर गाडी चालवल्यास चारपट दंड !

लखनौ : लखनौमध्ये जर तुम्ही बरमुडा, शॉर्ट्स अथवा लुंगी घालून गाडी चालवली तर तुम्हाला चारपट दंड भरावा लागेल. यासंदर्भात वाहतूक पोलीस अधीक्षकांनी नवीन फर्मान काढले आहे.  याअंतर्गत मोठे आणि जड वाहन चालवताना जर वाहतूक ॲक्टच्या नियमानुसार कपडे घातले नाहीत, तर नवीन दराने दंड वसूल केला जाणार आहे. वाहतूक पोलीस अधीक्षक म्हणाले की, गाडी चालवणाऱ्यांसाठी विशेष … Read more

दंड वाचवण्यासाठी दुचाकी चालकाने हेल्मेटसोबत केले असे काही….

वडोदरा : वाहतूक नियमांचे पालन होण्यासाठी लागू करण्यात आलेल्या नवीन मोटार वाहन कायद्यातील नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा दंड आकारला जात आहे. मात्र, सध्या एक व्हिडिओ सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.  यात एक ५० वर्षीय दुचाकी चालक हेल्मेटवरच सर्व कागदपत्रे चिकटवून प्रवास करत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.. दुचाकी चालकाचे रामपाल शाह असे नाव असून, ते … Read more

विम्याचे पैसे मिळावे म्हणून त्याने दिली आपल्याच हत्येची सुपारी !

जयपूर : राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यातील मंगरोप ठाण्याच्या हद्दीत आर्थिक अडचणींमुळे त्रासलेल्या एका फायनान्सरने आपलीच हत्या करण्यासाठी दोन मारेकऱ्यांना सुपारी दिल्याचे प्रकरण प्रकाशात आले आहे.  विम्याचे ५० लाख रुपये आपल्या कुटुंबाला मिळावेत, यासाठी फायनान्सरने हे पाऊल उचलल्याचे एका ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले. बलबीर खारोलने अनेक जणांना २० लाख रुपये उसने दिले होते. उसने दिलेली ही … Read more

प्लास्टिक बाटल्या द्या मोबाईल रिचार्ज मिळवा !

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुनर्वापर न करता येणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी केलेल्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून एक अभिनव संकल्पना मांडण्यात आली आहे.  त्यानुसार जर प्रवाशांनी टाकाऊ बाटली स्थानकावरील क्रशिंग मशिनमध्ये टाकली तर त्यांना मोफत मोबाईल रिचार्ज करून दिला जाणार आहे. परंतु हा रिचार्ज नेमका किती रुपयांचा असेल हे अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही. … Read more

काँग्रेस १११ तर राष्ट्रवादी १०४ जागा लढण्याची शक्यता

नवी दिल्ली : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंगळवारी दुपारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील जागावाटपाला अंतिम स्वरूप देण्याबाबत त्यांच्यात चर्चा झाल्याचे वृत्त आहे. राज्यात आघाडीची अधिकृत घोषणा करण्याविषयीसुद्धा पवार व सोनिया यांच्यात खलबते झाल्याचे बोलले जात आहे. राज्यात … Read more

लग्न मोडल्याने तरुणाने इमारतीवरून मारली उडी !

पालनपूर :- शहरात एका तरुणाचे लग्न मोडले. त्यामुळे तो खूप निराश झाला होता. नैराश्यग्रस्त अवस्थेतच त्याने पोलिसांच्या समोरच इमारतीवरून खाली उडी मारली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,वासणा गावातील राहुल वाल्मिकी (२१) याचे लग्न ठरले होते. परंतु नियोजित वधूने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे तो निराश झाला होता. सोमवारी तो शहरातील डॉक्टर्स हाऊस भागातील एका इमारतीवर आत्महत्या … Read more

आनंदाची बातमी : एसबीआयचे कर्ज पुन्हा स्वस्त…

दिल्ली :- देशातील स‌‌र्वात मोठी सरकारी बँक भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) पुन्हा एकदा कर्जावरील व्याजदरात कपात केली आहे. बँकेने सर्व प्रकारच्या कर्जावरील मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडस बेस्ट लेंडिंग रेट अर्थात एमसीएलआरमध्ये १० मूळ अंकांची (०.१० %) कपात केली आहे. बँकेने सलग पाचव्यांदा कर्जावरील व्याजदर घटवले आहेत. या कपातीमुळे बँकांच्या ग्राहकांना स्वस्त दरात कर्ज मिळणार आहे. … Read more

केंद्र सरकारने अवघ्या शंभर दिवसांत ऐतिहासिक कामगिरी बजावली

नवी दिल्ली : कलम ३७० रद्द करणे, तीन तलाक बंदी यासह अनेक धडाकेबाज निर्णय घेत केंद्र सरकारने अवघ्या शंभर दिवसांत ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. तसेच सामान्य नागरिकांना प्रत्येक स्तरावर बळकटी देण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली, अशा शब्दांत केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सरकारचा लेखाजोखा रविवारी जनतेपुढे मांडला आहे. मोदी सरकारला १०० दिवस पूर्ण … Read more

….तर देश मंदीच्या खाईत लोटला जाईल

नवी दिल्ली : अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करून मोदी सरकारने मौन बाळगले असून देशातील बिकट परिस्थिती लपविण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे, असा प्रहार काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी रविवारी ट्विटरवरून केला आहे. कंपन्या बंद पडत आहेत, व्यवहार ठप्प झाला आहे, असा आरोपही त्यांनी केला. दुसरीकडे, १०० दिवसांत विकास न घडविल्याबद्दल मोदींचे अभिनंदन, असा उपहासात्मक टोला राहुल गांधी … Read more

दारु पिऊन रिक्षा चालवणे पडले महागात, तब्बल ४७ हजारांचा दंड !

भुवनेश्वर ;- नवीन मोटर वाहन कायद्यात बदल झाल्यानंतर दारु पिऊन रिक्षा चालवणे चालकास चांगलेच महागात पडले. भुवनेश्वरात पोलिसांनी रिक्षा चालकावर या नियमाचा भंग केल्याने ४७ हजार ५०० रुपये दंड लावला. याच प्रकारे हरियाणातील गुडगावात रिक्षा चालकावर ३२ हजार रुपये दंड लावला आहे. तर ट्रॅक्टर चालकावर ५९ हजाराचा दंड लावण्यात आला. पोलिसांनी त्याला सामान्य नियम तोडल्याबद्दल … Read more

पंतप्रधान मोदी पाहणार गायीवरील शस्त्रक्रिया लाइव्ह !

नवी दिल्ली । मथुरेत ११ सप्टेंबरला आयोजित पशू-आरोग्य शिबिरात पाॅलिथिनी पोटात गेल्यामुळे आजारी असलेल्या गायीवर केली जाणारी शस्त्रक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी लाइव्ह पाहणार आहेत. ही शस्त्रक्रिया १२ डॉक्टरांचे एक पथक करणार असल्याचे बरेली येथील पशू आरोग्य संशोधन संस्थेचे संचालक डॉ. राजकुमार सिंह यांनी सांगितले.

खोटा एचआयव्ही रिपोर्ट दिल्याने गर्भवतीचा मृत्यू

चिडगाव (सिमला) : २२ वर्षीय अंकिताला तपासणीनंतर एचआयव्ही पाॅझिटिव्ह घोषित करण्यात आले. ती गर्भवती होती. एचआयव्ही कसा झाला, असा प्रश्न होऊ लागला. ती कोमात गेली, नंतर मृत्यू झाला. नंतर समजले की, टायपिंगच्या चुकीमुळे तिला एचआयव्ही पाॅझिटिव्ह घोषित केलेे होते. अंकिताचे वडील मियां राम यांनी सांगितले की, २१ ऑगस्टला रोहडूच्या संजीवनी रुग्णालयात सांगण्यात आले की, तिचे … Read more

सुप्रिया सुळे ठरल्या नंबर वन खासदार!

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट खासदार म्हणून निवडण्यात आलेले आहे. लोकसभा सदस्य म्हणून ही त्यांची तिसरी टर्म आहे. लोकसभेत विविध प्रश्न उपस्थित करत पुन्हा एकदा त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. १७ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात त्यांना सर्वोत्कृष्ट खासदार म्हणून निवडण्यात आलेले आहे. . … Read more

भाजप नेता म्हणतो श्रावण-भाद्रपद महिन्यात मंदी येते!

पाटणा : देशात आर्थिक मंदीवर राजकीय वर्तुळात चौफेर चर्चा सुरू असतानाच दरवर्षी श्रावण आणि भाद्रपद महिन्यात मंदी येतच असते, असे वादग्रस्त वक्तव्य बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी सोमवारी केले आहे. लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागल्यामुळे विरोधक खोडसाळपणे मंदीच्या मुद्यावरून विनाकारण गोंधळ घालत असल्याचा पलटवार त्यांनी केला आहे. सकल घरेलू उत्पादन अर्थात जीडीपी खाली घसरला … Read more

या राज्यात प्लास्टिक पिशव्यांवर बंदी,१ लाख रुपयांपर्यंतचा दंड आणि सहा महिन्यांचा कारावास!

लखनौ : उत्तर प्रदेशात ५० मायक्रॉनपेक्षा पातळ असलेल्या प्लास्टिक पिशव्यांवर रविवार (१ सप्टेंबर)पासून बंदी लागू झाली आहे. राज्याच्या या आदेशानुसार बंदी असलेल्या पिशव्या खरेदी किंवा विक्री केल्याचे आढळून आल्यास १ लाख रुपयांपर्यंतचा दंड आणि सहा महिन्यांचा कारावास होऊ शकतो, असे राज्य सरकारने जाहीर केलेले आहे. याबाबतच्या माहितीनुसार, राज्याचे मुख्य सचिव अवनिश अवस्थी यांनी २६ ऑगस्ट … Read more

पाकिस्तान भारतासोबत युध्दाच्या तयारीत?

नवी दिल्ली : काश्मीरवर दबाव निर्माण करण्यासाठी पाकिस्तान अनेक प्रकारचे प्रयत्न करत आहे. कूटनीतीत अपयशी झाल्यानंतर युध्द आणि अणुहल्ल्यांची धमकी देणाऱ्या पाकने आता सैन्यस्तरावर आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एका अहवालानुसार, पाकिस्तानी सेना बालटोरो सेक्टरमध्ये स्कार्डू परिसरात मोर्चांवर बंकर तयार करत आहे. पाकच्या ताब्यातील पीओकेमध्ये येणारा हा परिसर जवळपास कारगीलच्या समोर आहे आणि हा नियंत्रण … Read more