सावधान! मोबाइलमुळे होईल कोरोना, तज्ज्ञ म्हणतात…

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- मोबाईल ही सर्रास वापरली जाणारी गोष्ट. आता मोबाईल जीवनावश्यक गोष्ट झाली आहे.

परंतु मोबाइलचा संपर्क थेट चेहरा किंवा तोंडाशी येत असल्याने हा मोबाईल कोरोनाचा प्रसार करू शकतो असा इशारा रायपूर इथल्या एम्स रुग्णालयातील डॉक्टरांच्या एका गटाने दिला आहे.

या तज्ज्ञांनी कोरोना साथीच्या काळात आरोग्य केंद्रांमध्ये मोबाइल वापराबाबत इशारा दिला आहे. मोबाइलसारखी उपकरणं कोरोना व्हायरसचे वहन करू शकतात.

यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना व्हायरसची लागण होण्याची शक्यता आहे. प्रत्येक आरोग्य कर्मचारी 15 मिनिटं ते दोन तासात त्यांचा फोन वापरत असतात असं एका अभ्यासातून समोर आलं आहे.

त्याचप्रमाणे सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शननुसार मोबाइल फोन, काउंटर, टेबलचा वरचा भाग, दरावाज्याच्या कड्या, शौचालयातील नळ, की बोर्ड यांना सर्वाधिक वेळा स्पर्श केला जातो.

त्यामुळे अशा ठिकाणी संसर्गाचा धोका असतो असाही म्हटलं आहे.जागतिक आरोग्य संघटना आणि सीडीसी सारख्या आरोग्य संघटनांनीसुद्धा अनेक आदेश दिले आहेत.

जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या लेखात म्हटलं आहे की, मोबाइलच्या वापराबाबत कोणताच उल्लेख यामध्ये नाही. WHO ने कोरोनाला रोखण्यासाठी दिलेल्या नियमावलीतही हे सांगितलेलं नाही.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts