अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :- काही निर्बंध घालून बाजारामध्ये कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिनया लसींना DCGI ने विकण्यासाठी गुरूवारी मान्यता दिली आहे. म्हणजे करोना लस हॉस्पिटल आणि क्लिनीकमध्ये खरेदी करून तिथेच टोचून घेता येईल.
इतर कुठेही या लसी उपलब्ध नसणार, अशी माहिती सूत्रांनी दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही लसी दुकानात उपलब्ध होणार नाहीत.
केवळ खासगी रुग्णालये आणि दवाखाने लस खरेदी करू शकतील आणि त्या दिल्या जातील. खासगी हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत कोव्हॅक्सिनची किंमत प्रति डोस 1200 रू तर कोव्हीशिल्डची किंमत 780 रू प्रति डोस आहे. या किंमतीमध्ये 150 रू इतके सर्व्हिस चार्ज लावण्यात आला आहे.
देशात या दोन्ही लसीचा उपयोग हा आपत्कालीन वापरासाठी करण्यात येत आहे. केंद्रीय औषधी मानक नियंत्रण यांचेकडून कोविड 19 वर तज्ज्ञ समितीने 19 जानेवारी रोजी कोव्हीशील्ड आणि कोव्हॅक्सिनला प्रौढांसाठी काही निर्बंधासह नियमित विक्रीसाठी मंजुरी देण्याची शिफारस केली आहे.
नवीन औषधे आणि क्लिनिकल चाचण्या नियम, 2019 अंतर्गत मान्यता देण्यात आली आहे. कंपनीना क्लीनिकल चाचणी प्रशिक्षणाचा डेटा ही दयावा लागेल.
तसेच लस घेतल्यानंतर त्याच्या होणा-या परिणाम बघणे गरजे राहणार आहे. सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) च्या करोना संदर्भातील विषय तज्ञ समितीने १९ जानेवारी रोजी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) च्या कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सीनला काही अटींच्या अधीन राहून
नियमित विक्रीसाठी मान्यता देण्याची करण्याची शिफारस केली आहे. यानंतर ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने ही मंजुरी दिली.