अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- Child Vaccination: आजपासुन मुलांसाठी लसीकरण सुरु जाणून घ्या नोंदणी कशी करायची ? लसीकरण (Vaccination) हा कोरोनापासून वाचण्याचा एकमेव उपाय आहे.(Child Vaccination)
याच लसीकरणाची राष्ट्रीय स्तरापासून ते स्थानिक पातळीवर सध्या मोठ्या प्रमाणात दखल घेतली जात आहे. त्यामुळेच १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांची आजपासून लसीकरणासाठी नोंदणी (vaccination) सुरू करण्यात आलीय. याच लसीकरणासंबंधित संपूर्ण माहिती आपण आज या लेखामध्ये जाणून घेऊयात…
मुलांसाठी लसीकरण (Vaccination For Children) : मुलांच्या लसीकरणासाठी(vaccination) तुम्ही ऑनलाइन अपॉइंटमेंट घेऊन किंवा गर्व्हन्मेंटच्या वेबसाईटवर जाऊन लसीकरणासाठी नोंदणी करू शकता. मुलांना आता Covaxin दिली जाणार आहे. येत्या ३ जानेवारीपासून १५ ते१८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी हि लसीकरण मोहीम देशभरात सुरू होणार आहे. लसीकरणासाठी नोंदणी (Registration For Vaccination) :
नवीन वर्षात (new year)भारतात पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्याचं चित्र येत्या काही दिवसांत पाहायला मिळत आहे. ओमिक्रॉन(Omicron) या कोरोना विषाणूच्या नवीन प्रकाराने भारतातील अनेक शहरांमध्ये हैदोस घेतला आहे.
हीच बाब गांभीर्याने लक्षात घेत येत्या ३ जानेवारीपासून केंद्र सरकार(central government) १५ ते १८ वयोगटातील बालकांसाठी लसीकरण (Vaccination) कार्यक्रम सुरू करणार आहे. प्रौढांप्रमाणेच आता मुलांचेही लसीकरण केले जाणार आहे. ज्यासाठी नोंदणी (Registration) करणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे (National Health Authority) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आर.एस. शर्मा यांनी सांगितले आहे की, १ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुले लसीसाठी नोंदणी (Registration) करू शकतात. मुलांच्या लसीकरणासाठी, तुम्ही Co-WIN अँपवर नोंदणी करू शकता.
२००७ मध्ये किंवा त्यापूर्वी जन्मलेल्या सर्व लोकांची नोंदणी झाल्यानंतरच त्यांना लसीकरण (Vaccination) करता येईल असं देखील यावेळी सांगण्यात आलं आहे. लसीकरणासाठी अपॉइंटमेंट घेण्यासाठी ऑनलाइन किंवा साइटवर जाऊन बुकिंग केलं जाऊ शकते.
मुलांना आता कोवॅक्सीन (Covaxin) दिले जाईल. Zydus Cadila च्या Zycov-D या लसीला २० ऑगस्ट रोजीच मान्यता देण्यात आली. परंतु अजून लसीकरण कार्यक्रमात त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. ही लस १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दिली जाईल.
तुम्हाला माहित आहे का, जगातील अनेक देशांमध्ये लहान मुलांना कोरोनाची लस दिली जात आहे. ही लस मुलांमध्ये प्रभावी ठरली आहे. भारत बायोटेकने (Bharat Biotech) या कोवॅक्सीनची चाचणी केली आहे, जी प्रभावी ठरली आहे.
या लसीचे कोणतेही मोठे दुष्परिणाम (side effects) आतापर्यंत नोंदवले गेलेले नाहीत. लस दिल्यानंतर ताप येणे, शरीर दुखणे आणि इंजेक्शनच्या ठिकाणी सूज येणे यासारखे दुष्परिणाम होऊ शकतात.
जी लस मोठ्यांना दिली जात आहे, ती लहान मुलांनाही दिली जाणार आहे. त्यामुळे लहान मुलांच्या लसीमधील दोन डोसमध्ये २८ दिवसांचे अंतर असेल. जर पहिला डोस ३ जानेवारीला घेतला असेल तर ३१ जानेवारीनंतर दुसरा डोस दिला जाऊ शकतो.
शासनाने लसीकरणासाठी अनेक केंद्रे सुरू (vaccination centers) केली आहेत. या केंद्रांवर जाऊन तुम्ही लस घेऊ शकाल. जिथे प्रौढांना लस दिली जात आहे, तिथे लहान मुलांना लस दिली जाणार की लहान मुलांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र असेल, याबाबत सरकारकडून अजून काहीही सांगण्यात आलेले नाही.
खालील पद्धतीने नोंदणी करा : Co-WIN या पोर्टलवर १ जानेवारीपासून नोंदणी सुरू झाली आहे. यासाठी शाळा ओळखपत्र (identity card)किंवा आधार कार्डसह(Aadhar card) सरकारने जारी केलेले कोणतेही ओळखपत्र वापरले जाऊ शकते.
नोंदणी आधीपासून वापरलेल्या फोन नंबरसह देखील केली जाऊ शकते आणि नवीन नंबरसह कोविन पोर्टलवर (Co-WIN) नोंदणी करण्याचा पर्याय आहे. ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर किंवा थेट केंद्रावर जाऊन आता मुलांचे लसीकरण करता येईल.
त्यामुळे तुमच्या देखील मुलांनी लस घेतली नसेल तर त्यांना आजच बुकिंग करायला सांगा आणि त्यांचही लसीकरण करा. कारण हे जीवन फार अनमोल आहे.