अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :- वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावापासून रक्षणासाठी लसीकरण मोहीम देशात प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. मात्र लसीकरणाबरबच एक नवा वाद देखील गेल्या काही दिवसांपासून उपस्थित होत आहे.
कोरोना लस घेतल्याच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापण्यात येत असल्याने वाद निर्माण झाला होता. मात्र आता काही राज्यात लस घेतल्याच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो प्रमाणपत्रावर दिसणार नाही.
कोविड लस घेतल्यानंतर लसवंताला ऑनलाईन मिळणाऱ्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे. या फोटोवरून विरोधकांनी सुरुवातीला मोठी राळ उडवली होती.
याबाबत व्यक्तीने केरळ हायकोर्टात याचिकाही दाखल केली होती, मात्र न्यायमूर्तींनी याचिका फेटाळत, पंतप्रधान यांचा फोटो प्रमाणपत्रावर असल्याने कसली अडचण होते असे म्हणत फटकारले होते.
मात्र आता लवकरच होत असलेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पाच राज्यात आदर्श आचारसंहितेची अडचण असल्याने या राज्यात वितरीत होणाऱ्या कोविड प्रमाणपत्रावरील पंतप्रधान मोदी यांचे छायाचित्र टाकता येणार नाही.
दरम्यान शनिवारी मुख्य निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखेची घोषणा केली होती.
या घोषणेनुसार उत्तर प्रदेशात सात टप्प्यात पंजाब, उत्तराखंड, गोवा मध्ये एका तर मणिपूरमध्ये दोन टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत.
पंतप्रधान देशाचे असले तरी ते एका राजकीच पक्षाचे प्रतिनिधित्व म्हणून जाहीर प्रचारात सहभागी होणार असतात. त्यात ते आपल्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करणार असतात.
अशा परिस्थितीत राष्ट्रीय कार्यक्रम असलेल्या लसीकरणाच्या मोहिमेतील प्रमाणपत्रावर त्यांचे छायाचित्र असणे हे आचारसंहितेचा भंग ठरू शकतो, त्यामुळे निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.