अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- भारतात ओमायक्रॉनची वाढती संख्या लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लहान मुलांच्या लसीकरणाची घोषणा केली. यानुसार 3 जानेवारी पासून देशभरात 15 ते 18 वयोगटातील किशोरवयीन कोरोना लसीचा डोस मिळणार आहे.(child vaccination)
दरम्यान देशात वाढती रुग्णसंख्या आणि ओमायक्रॉनचा धोका यामुळे लसीकरण महत्त्वाचं आहे. त्यामुळे वेळ न दवडता लहान मुलांचंही लसीकरण करून घ्यावं.
CoWIN प्लॅटफॉर्मवर तुमच्या मुलांच्या लसीकरणाची नोंदणी कशी करावी? जाणून घ्या पद्धत सर्व प्रथम Covin App वर जा. तुमचा मोबाईल नंबर टाका. ओटीपी येईल आणि तो टाकून लॉग इन करा.
आता आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, पेन्शन पासबुक, एनपीआर स्मार्ट कार्ड, व्होटर आयडी, युनिक डिसॅबिलिटी आयडी किंवा रेशन कार्ड यापैकी कोणताही एक फोटो आयडी पुरावा निवडा.
तुम्ही निवडलेल्या आयडीचा नंबर, नाव टाका. त्यानंतर जेंडर आणि जन्मतारीख निवडा.
मेंबर एॅड झाल्यानंतर, तुम्ही तुमच्या जवळच्या लसीकरण केंद्राचा पिन कोड टाका. लसीकरण केंद्रांची यादी येईल.
आता लसीकरणाची तारीख, वेळ आणि लस निवडा. केंद्रावर जाऊन लसीकरण करा.
लसीकरण केंद्रावर, तुम्हाला संदर्भ आयडी आणि सीक्रेट कोड प्रदान करावा लागेल. जे तुम्ही नोंदणी केल्यावर तुम्हाला मिळेल.
त्याचप्रमाणे, तुम्ही तुमच्या लॉगिनमध्ये इतर सदस्य जोडून त्यांच्या लसीकरणाची नोंदणी करू शकता.