अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- महाराष्ट्रात कोरोना व्हायरस संक्रमितांची आणि आमायक्रोन या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे संक्रमित होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढते आहे.(Strict restrictions)
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज (30 डिसेंबर) दिवसभरात तब्बल 5,368 कोरोना संक्रमितांची नोंद झाली. करोना रुग्णसंख्या वाढल्याने राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
मुंबईत निर्बंध घालण्यात आल्यानंतर आता राज्यात सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यास मनाई करण्यात आली असून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसंच लग्न आणि इतर कार्यक्रमांसाठी 50 लोकांची मर्यादा घालण्यात आली आहे. राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
पर्यटन ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. ही नियमावली 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.
राज्यात दोन दिवसांत करोना रुग्णसंख्येत दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली. शिवाय ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून, या विषाणूच्या संसर्गामुळे एकाचा मृत्यूही झाला.
या पार्श्वभूमीवर निर्बंध लादण्याशिवाय पर्याय नसल्याचे सरकारच्या उच्चपदस्थांचे मत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाविषयक तज्ज्ञ समितीच्या सदस्यांशी सविस्तर चर्चा केल्यावर निर्बंध अधिक कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या संदर्भातील आदेश रात्री उशिरा जारी करण्यात आला. हे सर्व निर्बंध शुक्रवारी मध्यरात्रीपासून अमलात येतील. नियमावली! विवाहाच्या बाबतीत, मग ते बंदिस्त जागेत असो किंवा मैदान असो, उपस्थितांची जास्तीत जास्त संख्या ५० व्यक्तींपुरती मर्यादित असेल.
सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक असो, कोणत्याही मेळाव्याच्या किंवा कार्यक्रमाच्या बाबतीत. बंदिस्त जागेत असो किंवा खुले असो, उपस्थितांची जास्तीत जास्त संख्या ५० व्यक्तींपुरती मर्यादित असेल.
अंत्यसंस्काराच्या बाबतीत, उपस्थितांची जास्तीत जास्त संख्या 20 व्यक्तींपुरती मर्यादित असेल राज्याच्या कोणत्याही भागात जे पर्यटन स्थळे किंवा इतर ठिकाणे आहेत जे समुद्रकिनारे, मोकळी मैदाने जिथे गर्दी होण्याची शक्यता आहे तिथे स्थानिक प्रशासनाला १४४ लागू करण्याचा अधिकार आधीच अस्तित्वात असलेल्या इतर सर्व सूचनाही लागू राहतील.