अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :- कोरोना संसर्ग नवीन वर्षांपासून झपाट्याने वाढल्याने अहमदनगर मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोना संसर्गचा वेग दिवसेंदिवस वाढत चालला असून, आज पुन्हा नगर जिल्ह्यात कोरोनाचे ८४७ रुग्णसंख्या कोरोना बाधित आढळून आले आहे.
मागील तीन दिवसांत जिल्ह्यात २ हजार १५२ करोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. प्रशासनाकडून वारंवार नागरिकांनी कोविड नियमांचे पालक करून करोनाला रोखावे, असे आवाहन येत आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये ३१८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३८७ आणि अँटीजेन चाचणीत १४२ रुग्ण बाधीत आढळले.
यात एकट्या नगर शहरातील २८० जणांचा समावेश आहे. राहाता तालुक्यात १०९ बाधित आढळले. अकोले ६२, श्रीरामपूर ५२, नगर ग्रामीण ४८, भिंगार कॉंटेन्मेन्ट ४७, कोपरगाव ३६,
इतर जिल्हा ३४, राहुरी २९, पारनेर २८, संगमनेर २७, श्रीगोंदा २६, पाथर्डी २३, नेवासा १७, जामखेड ०९, मिलिटरी हॉस्पिटल ०८, इतर राज्य ०६,कर्जत ०३ आणि शेवगाव ३ रुग्ण आढळून आले आहे.
येणाऱ्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी आढावा बैठक घेऊन सर्व तालुक्यातील लसीकरण आणि कोरोना चाचण्या वाढवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
संबंधित सर्व यंत्रणांनी आपापल्या क्षेत्रात नियमांची कडक अंबलबजावणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा सूचना देखील जिल्हाधिकारी यांनी मागे दिल्या आहे.