अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :- सध्या जगात कोरोना आणि ओमायक्रॉन या कोरोनाच्या विषाणूने जगात थैमान मांडले असताना, दुसरीकडे ब्रिटनमध्ये सरकारने कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले आहेत.
पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी बुधवारी देशात मास्क परिधान करण्यासह इतर निर्बंध हटवण्याची घोषणा केली आहे. जॉन्सन म्हणाले की, आमच्या शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, देशात कोरोना व ओमायक्रॉन या विषाणुने आधीच उच्चांक गाठला आहे.
त्यामुळे कोरोना निर्बंध शिथिल केले जाऊ शकतात. अशा परिस्थितीत, आता कोविड निर्बंध उठवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पण जॉन्सन यांच्या या निर्णयामुळं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दरम्यान, जगात नुकत्याच जाहीर झालेल्या अहवालानुसार, 30.17 लाख लोकांना नव्याने कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे.
तर 8,039 लोकांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय, अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) देखील असा इशारा दिला होता की, ओमायक्रॉन व्हेरियंटला हलक्यात न घेणेच शहाणपणाचे आहे.
कोरोनाचे इतर प्रकार देखील येऊ शकतात, त्यामुळे सर्व सर्व देशांनी सतर्क राहणे आवश्यक आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले.आता ब्रिटनमधील नागरिक नो मास्क, नो सॅनेटायझर हे वापरण्यास काहीही बंधन नसल्याचे जॉन्सन म्हणाले.
देशातील ओमायक्रॉनची परिस्थिती पाहता अनेक निर्बंध शिथिल केल्यानंतर ब्रिटनमधील लोकांना यापुढे घरून काम (Work From Home) करण्यास सांगितले जाणार नाही. तसेच, मास्कचा अनिवार्य वापर करण्याचा नियम सरकारने रद्द केला आहे.
आता लोक मास्कशिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरू शकतात. यासोबतच, लवकरच शालेय वर्गातही मास्क घालण्याच्या नियम हटवण्यात आले आहेत. त्यामुळं नागरिकांना आता कोणतेही कोरोनाचे नियम पाळण्याची गरज नाही, असं पंतप्रधान जॉन्सन म्हणाले.