कोरोना व्हायरस

कोरोनाबाधितांची वाढ पाहता राज्य तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :-  पुन्हा एकदा राज्यासह मुंबईत कोरोनाने डोके वर काढले आहे. मुंबईत अवघ्या चार दिवसांत दैनंदिन रुग्णसंख्या ६८३ वरुन १,३७७ झाली आहे.(corona patients inceased)

दरम्यान बुधवारी दिवसभरात राज्यात ३,९०० रुग्ण आढळल़े त्यात सर्वाधिक २५१० रुग्ण मुंबईत आढळले आहेत़. मुंबईसह ठाणे परिसरात एका दिवसात दुप्पट रुग्णवाढ नोंदविण्यात आली आह़े. कोरोनाच्या मागील दोन लाटांच्या तुलनेत हे प्रमाण चिंताजनक असले तरीही रुग्णालयात दाखल करावे लागणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी असल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मोठी रुग्णवाढ नोंदविणाऱ्या मुंबईत बुधवारी अडीच हजाराहून अधिक रुग्ण आढळल़े मंगळवारी मुंबईत १३७७ रुग्ण आढळले होत़े म्हणजे एका दिवसात मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या दुप्पट झाली़ ठाणे जिल्ह्यातही बुधवारी ४९३ रुग्ण आढळल़े मंगळवारच्या तुलनेत ही संख्या दुप्पट आह़े गेल्या २४ तासांत राज्यात २० करोना रुग्णांचा मृत्यू झाला़

दिवसभरात १३०६ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतल़े राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या १४ हजार ६५ इतकी झाली आहे.

तर राज्यात बुधवारी ओमायक्रॉनचे ८५ नवे रुग्ण आढळल़े त्यातील ३४ रुग्ण मुंबईतील असून, नागपूर आणि पिंपरी चिंचवडला प्रत्येकी तीन, नवी मुंबई, पुणे मनपा प्रत्येकी २ रुग्ण आहेत़

दैनंदिन रुग्णसंख्या वाढत असली तरीही रुग्णालयात दाखल होण्याची गरज लागणाऱ्या बाधितांचे प्रमाण कमी आहे. खबरदारी म्हणून कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. लक्षणे जाणवल्यास निदान, विलगीकरण आणि उपचारांना प्राधान्य द्या असे आवाहन करण्यात आले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office