अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :- सुरुवातीला ओमिक्रोनचे (Omicron) रुग्ण बऱ्यापैकी आंतराष्ट्रीय प्रवास केलेले होते. परंतु आता अलीकडे हळू हळू असे काही रुग्ण निघाले कि त्या व्यक्तीने कुठलाही प्रवास केलेला नाही त्यांना सुद्धा ओमिक्रोनची बाधा झाली (omicron).
महाराष्ट्रात २९ डिसेम्बर रोजी ८५ रुग्णनांची नोंद झाली होती . त्या ८५ रुग्णांपैकी ३८ रुग्णांनी कुठलाही प्रवास केलेला नाही तरीसुद्धा त्यांना ओमिक्रोन झाला आहे. या सर्व प्रकियेला ओमिक्रोनचं लोकल ट्रान्समिशन होणं असे म्हणतात. आज एकट्या मुंबईतून ३६७१ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. या ३८ लोकांवरून ओमिक्रोनचं लोकल झालं असं म्हणता येईल असे महाराष्ट्राचे सर्वेक्षण अधिकारी DR. प्रदीप आवटे सांगतात.
OMICRON बाधित महाराष्ट्रातील रुग्ण संख्या
१) मुंबई – १३७
२ ) पुणे शहर – ११
३) पुणे ग्रामीण – १८
४) पिंपरी – चिंचवड – २५
५) ठाणे – ८
६) नागपूर – ६
७) सातारा आणि उस्मानाबाद – ५
८) वसई -विरार – ३
९) नवी मुंबई , कल्याण आणि पनवेल – ८
राज्यात तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे असं म्हणता येईल काय ?
तज्ज्ञांच्या मते, झपाट्याने वाढणारी रुग्ण संख्या तिसऱ्या लाटेची सुरुवात आहे.
मुंबईत एक दिवसात कोरोना रुग्णांची संख्या दुपटीने वाढत आहे हे तिसऱ्या लाटेचेच लक्षण आहे म्हणण्यास वाव आहे.
ओमिक्रोन स्ट्रैन सौम्य आहे काय ?
DR. जोशी म्हणतात OMICRON रुग्ण संख्या वाढली तरी लोकांना गंभीर आजार होत नाहीत आणि मृत्यूची संख्या सुदैवाने कमी आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नये पण काळजी घेतली पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला.