अहमदनगर क्राईम

Ahmednagar Crime : रस्त्यात आडवून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ८ जणांवर गुन्हा दाखल

Ahmednagar Crime : मोटारसायकलवरून जात असताना रस्त्यात अडवून लोखंडी रॉडने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ८ आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना रविवार, (दि. १७) रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली. याबाबत बोधेगाव येथील सोनू जावेद कुरेशी यांनी शेवगाव पोलिसांत फिर्याद दखल केली आहे.

याबाबतची माहिती अशी की, बोधेगाव येथील सोनू जावेद कुरेशी व अब्दुल रेहमान इस्माईल कुरेशी हे दोघे जण आजारी मामाला भेटून घरी बोधेगावकडे येत असताना रात्री ९.३५ च्या दरम्यान आमच्या दुचाकीला एक पिकअप वाहन (क्र. एम.एच.१६ सी.सी. २६७४) आडवा आला.

तेव्हा मी माझी गाडी थांबवली असता, पिकअपमधून अजय विष्णू जोगदंड, राजेंद्र विष्णू जोगदंड, किशोर दिनकर मिसाळ, ऋतिक दिनकर मिसाळ, लक्ष्मण मधुकर मिसाळ, कृष्णा लहानू मिसाळ सर्व रा. बोधेगाव तसेच युवराज एकनाथ खुडे, रा. नागलवाडी व तुषार (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) हे सर्वजण गाडीतून खाली उतरले

व आम्हाला म्हणाले, बकऱ्या चारण्यावरून आमच्यासोबत भांडणे करता का, तुम्ही लय माजले का, असे म्हणून अजय जोगदंड याने गाडीमध्ये असलेल्या लोखंडी रॉडने माझा मावस भाऊ अब्दुल रेहमान यांच्या डोक्यावर मारून त्यास जखमी केले.

त्यानंतर युवराज खुडे व किशोर मिसाळ यांनी माझ्या खिशातील २२ हजार रुपये काढून घेतले तसेच माझ्या हातातील तीन ग्रॅमची अंगठी ऋतिक मिसाळ, कृष्णा मिसाळ याने काढून घेऊन पसार झाले.

आम्ही बोधेगाव पोलीस दूरक्षेत्रासमोर गेलो असता, रस्त्यावर मला व माझ्या भावास लाथाबुक्यांनी मारहाण करून आम्ही तुमच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करू, असे म्हणाले.

याबाबत कुरेशी यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशनला आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास शेवगावचे पोलीस निरीक्षक दिगांबर भदाने यांच्या मार्गदर्शनाखाली बोधेगाव पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस करत आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts