अहमदनगर क्राईम

शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या की, घातपात. काय आहे मृतदेहाचे अकोले कनेक्शन ?

सप्तशृंगी गडावरील पाट झाडीत गुरुवारी (दि.४) रोजी एका शेतकऱ्याचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला. शेतमालाच्या व्यापाऱ्याने या शेतकऱ्याचे अपहरण करून त्याचा खून केला असल्याचा आरोप शेतक-याच्या कुटुंबीयांनी केला आहे.

जीव धोक्यात असल्याचे लक्षात येताच शेतकऱ्याने आपल्या कुटुंबियांना दबक्या आवाजात ऑडिओ व व्हिडीओ पाठवल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून सर्व शक्यता तपासून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

जगदीश बाळू जगदाळे (वय ३७) रा. जायखेडा, ता. सटाणा, जि. नाशिक) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्या मृत्यूस अकोले तालुक्यातील समशेरपूर येथील एक भाजीपाला व्यापारी जबाबदार असल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मृताचे नातेवाईक व पोलिसांच्या माहितीनुसार, जगदीश जगदाळे हे नाशिक जिल्ह्यातील शेतक-यांकडून शेतमाल घेऊन अकोले तालुक्यातील समशेरपूर येथील संशयित व्यापाऱ्याकडे द्यायचे, मात्र हा व्यापारी जगदाळे यांना नियमित पैसे देत नव्हता, त्यातून दोघांमध्ये वाद सुरू होता.

त्या व्यापाऱ्याकडून शेतमालाची मोठी रक्कम येणे असल्याने जगदाळे वारंवार विचारणा करायचे. तरीही, तो व्यापारी शेतमालाचे पैसे जगदाळेंना देत नव्हता. जगदाळे यांनी मंगळवारी (दि. २) सकाळी व्यापाऱ्यास मोबाईलवरून कॉल करून शेतमालाच्या पैशांबाबत विचारण केली.

त्यावेळी या व्यापाऱ्याने जगदाळे यांना समशेरपूर येथे बोलाविले होते. त्यानुसार जगदाळे समशेरपूरला गेले; मात्र परत आले नाहीत. जगदाळे यांच्या कुटुंबियांनी जायखेडा सुरू पोलीस ठाण्यात जगदाळे बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.

दरम्यान, जगदाळे यांच्या कुटुंबियांना व्हिडीओ व ऑडिओ मेसेज आले. त्यामध्ये ते भयभीत अवस्थेत दबक्या आवाजात बोलत असल्याचे दिसून येत होते. तो व्यापारी आणि त्याच्या साथीदारांनी कारमधून समशेरपूरपासून ५० किलोमीटर अंतरावरील अनोळखी ठिकाणी आणले असल्याचे जगदाळे यांचे नातेवाईक सांगतात.

जगदाळे यांच्या पॅन्टच्या खिशात गुरुवारचे (दि. ४) बसचे तिकीट आढळून आले. त्यातून जगदाळे कुटुबियांचा संशय बळावला. त्यामुळे जगदाळे यांनी गळफास घेतला नाही, तर त्यांचा खून करण्यात आला आहे, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

कारमध्ये बसलेले लोक मद्यपान करत असल्याचेही व्हिडीओमध्ये दिसत आहे. जगदाळे हे जीवघेण्या परिस्थितीत असल्याचे समजताच त्यांच्या पत्नी व नातेवाईकांनी जायखेडा पोलीस ठाण्यात जाऊन आपबिती सांगितली. याप्रकरणी जगदाळे बेपत्ता असल्याची तक्रार जगदाळे कुटुंबीयांनी दाखल केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

जगदाळे कुटुंबियानी त्या व्यापाऱ्यास कॉल करून जगदीश जगदाळे कुठे आहेत, अशी विचारणा केली. त्यावेळी त्या व्यापा-याने संगमनेर बसस्थानकातून वणी बसमध्ये जगदाळेयाना बसवून दिल्याचे सागितले. त्यानुसार जगदाळे कुटुंबियांनी वणी आणि सप्तशृंगी गड परिसरात त्यांचा शोध घेतला,

गडावरील एका झाडाला जगदाळे यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत असल्याची माहिती पोलीस व जगदाळे कुटुं‌बियांना समजताच सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी जगदाळे यांचा मृतदेह दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला.

सप्तशृंगी गडावर जगदीश जगदाळे यांचा मृतदेह आढळून आला नोंद करण्यात आली आहे. नातेवाईकांनी संशयास्पद मृत्यू झाल्याचा आरोप केला असून,
त्यांच्या जबाबानुसार तपास केला जाणार आहे, असे कळवणसप्तशृंगी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सोपान शिरसाठ, म्हणाले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts