अहमदनगर क्राईम

कारंजी घाटात आढळला अज्ञात पुरुषाचा अर्धवट जळालेला मृतदेह !

कल्याण-निर्मळ राष्ट्रीय मार्गावरील करंजी घाटामध्ये माणिकशहा पिरबाबा दर्गाजवळील धोकादायकक वळणाजवळ एका वीस फूट खोल दरीमध्ये अंदाजे ३५ वय असलेल्या एका पुरुषाचा अर्धवट जळालेला मृतदेह रविवारी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

करंजी घाटामध्ये एका पुरुषाचा मृतदेह बेवारसपणे पडलेला असल्याची माहिती पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना समजल्यानंतर पोलीस निरीक्षक मुटकुळे यांच्यासह डीवायएसपी सुनील पाटील, उपनिरीक्षक लिमकर, जगदीश मुलगीर, विलास जाधव यांच्यासह करंजी पोलीस चौकीचे हवालदार दळवी, कुसळकर, बेरड, बुचकूल तात्काळ करंजी घाटात घटनास्थळी दाखल झाले.

दुपारी एक वाजण्याच्या सुमारास या मयत व्यक्तीचा मृतदेह खोल दरीतून वर काढण्यात आल्यानंतर या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह अर्धवट अवस्थेत जळालेला असल्याचे आढळून आले. त्यामुळे हा घातपाताचाच प्रकार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

त्या दृष्टीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे या गुन्ह्याचा पुढील तपास होणार आहे. या संपूर्ण प्रकरणासंदर्भात पाथर्डी पोलिसांत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे. करंजी घाटात अर्धवट जाळलेल्या पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती समोर आल्याने प्रवाशांमध्ये मात्र भीतीचे वातावरण आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts