Ahmednagar Crime : मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या कारणावरून दोघांनी महिलेवर कोयत्याने वार करत जखमी केले.
बुधवारी मध्यरात्री शहरातील मालपाणी हेल्थ क्लब जवळील काशाई मंदिराच्या मागे हा प्रकार घडला.
या मारहाणीत महिलेच्या हातावरील बोटावर व टोक्याला गंभीर जखम झाली.
अमृता विक्रम चव्हाण (वय २७, मालपाणी हेल्थ क्लब जवळ) यांनी फिर्यादीत म्हटले आहे,
माझा मित्र विलास काळे व मी घरी असताना राजेश जंबुकर व त्याचा मित्र वैभव दांदे (पूर्ण नाव माहित नाही) दोघे माझ्या घरी आले.
तू माझा मोबाईल नंबर ब्लॉक का केला? असे म्हणत जंबुकरने हातातील कोयत्याने दोन्ही हाताच्या बोटावर व डोक्यावर वार केले.
दांदे याने विलास काळे याला लाकडी दांड्याने व मला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.
अमृता चव्हाण यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी राजेश जंबुकर व वैभव दांदे यांच्यावर मारहाणीसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला.