अहमदनगर क्राईम

Ahmednagar Crime News : पत्नीने आत्महत्या केल्यानंतर पतीचीही आत्महत्या

Ahmednagar Crime News : आजारपणाला कंटाळून पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर तिच्या पतीनेही सातच दिवसात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील पठार भागातील म्हसवंडी येथे घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तान्हाजी ज्ञानदेव बोडके (वय ३२) व त्यांची पत्नी सारिका तान्हाजी बोडके (वय २६), असे आत्महत्या केलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. बोडके दाम्पत्य म्हसवंडी येथे राहत होते. त्यांना पाच वर्षांची मुलगी आहे.

सारिका बोडके ही गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. तिच्यावर उपचार सुरू होते. या आजारपणाला कंटाळून तिने आपल्या राहत्या घरात १३ जुलै रोजी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. सात दिवसानंतर बुधवारी (दि. १९) तिचा पती तान्हाजी बोडके याने परिसरातील वनविभागाचे क्षेत्रात झाडाच्या फांदीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.

या घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. आत्महत्येपूर्वी तान्हाजी बोडके यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती.

त्यामध्ये पत्नीवर खूप जीव होता, तिची आठवण येत आहे. मी आत्महत्या करत आहे. माझी जमीन मुलीला देण्यात यावी. कोणालाही दोष देऊ नये, असा मजकूर या चिट्टी मध्ये लिहिलेला होता. या घटनेबाबत वैभव विठ्ठल बोडके यांनी घारगाव पोलीस ठाण्यात खबर दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून ते पुढील तपास करीत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts