अहमदनगर क्राईम

Ahmednagar News : भाताचा वाद शिगेला पोहोचला, माजी नगरसेवकाच्या भावासह चौघांनी घरात घुसून बेदम मारले

Ahmednagar News : नगर शहरातील मारहाणीचे प्रकार, इतर काही गुन्हेगारी घटना कमी होतानाचे नाव दिसत नाही. मारहाणीसारख्या काही घटना ताजा असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

चिमण्यांना भात टाकल्याच्या कारणावरून घरात घुसून मुलांना माजी नगरसेवकाच्या भावासह चौघांनी मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. २९) कल्याण रोडवरील शिवाजीनगर येथील व्यंकटेश कॉलनीत घडली.

याबाबत रामलाल कचरू परदेशी यांनी फिर्याद दिली असून या प्रकरणी चार जणांविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हर्षल देवीदास सोनवणे, अथर्व देवीदास सोनवणे, ओंकार देवीदास सोनवणे (तिघे रा. व्यंकटेश कॉलनी, शिवाजीनगर) व माजी नगरसेवक सचिन शिंदे यांचा भाऊ (नाव माहीत नाही.) अशा चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समजली आहे.

समजलेली अधिक माहिती अशी : शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या मुलीने घरासमोर मोकळ्या जागेत चिमण्यांसाठी भात टाकला होता. त्याचा राग आल्याने आरोपी हर्षली हिने इथे घाण का केली, असे म्हणत फिर्यादीच्या मुलीला शिवीगाळ करत मारहाण केली.

त्यानंतर हर्षली सोनवणे हिने इतरांना बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी फिर्यादीच्या घरात घुसून मुलांना मारहाण केली. मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देखील दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

त्यानंतर फिर्यादीने पोलिसांनी धाव घेतली. या फिर्यादीवरून वरील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील हाणामारीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले असून या समाजविघातक प्रवृत्तीचा बीमोडाल पोलिसांनी करावा अशी मागणी जनसामान्यांमधून होत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts