कोपरगाव येथील एका मालकाच्या घरातून एक लाख ३९ हजाराचे दागिने चोरणाऱ्या फरार नोकराला पकडून येथील शहर पोलिसांनी नुकतीच अटक केली. पोलिसांनी त्याला विश्वासात घेत पोलीसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल करून चार तोळे दागिने काढून दिले.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात एका कामगाराने येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत मालकाच्या घरात चोरी केली. त्याने घरातून एक लाख ३९ हजाराचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. रुपेश सुनील कोपरे (रा. संजयनगर, कोपरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस केली; परंतु तो सुरूवातीला उडवाउडवीचे उत्तरे देत होता. त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारपुस केली असता,
त्यानेच चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यास गुन्ह्यात अटक करुन त्याची पोलीस कोठडी घेऊन त्याच्याकडे सखोल तपास करुन सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
याप्रकरणी रितेश मदनलाल बडजाते (वय ३८, रा. काले मळा, कोपरगाव) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. हा गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदिप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल बी. एस. कोरेकर करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक प्रदिप देशमुख,
उपनिरीक्षक रोहीदास ठोंबरे, पोलीस उपनिरिक्षक भरत दाते, हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब कोरेकर, कॉन्स्टेबल गणेश काकडे, सुशिल शिंदे, बाळासाहेब धोंगडे, राम खारतोडे, विलास मासाळ यांनी केली.