अहमदनगर क्राईम

अहमदनगर मनपाच्या अधिकाऱ्यास लाच घेताना रंगेहाथ पकडले ! शहरात खळबळ….

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर महानगरपालिकेतील अधिकारी असलेल्या प्रवीण मानकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. 

ठेकेदाराचे बिल काढण्यासाठी 20 हजारांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी मानकर यांच्या विरोधात तोफखाना पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे नगर शहरात खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, तक्रारदार यांनी व त्यांचे मावसभाऊ यांनी ठेकेदार म्हणून नगर महानगरपालिकेच्या केलेल्या कामाची बिले मंजूर करुन तक्रारदार यांना चेक अदा केलेच्या मोबदल्यात लोकसेवक मानकर यांनी तक्रारदार यांच्याकडे २५,००० रुपयांची मागणी केली.

तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे दि. ७ ऑक्टोबर रोजी दिलेल्या तक्रारीवरून त्याच दिवशी केलेल्या लाच मागणी पडताळणीमध्ये लोकसेवक मानकर यांनी तक्रारदार यांच्याकडे २०,००० रुपयांची मागणी केली.

व १५,००० रुपये स्विकारण्याची संमती दर्शवली. त्यानुसार आज तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मानकर यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts