अहमदनगर क्राईम

Ahmednagar News : अबब ! अहमदनगरमधील ‘या’ गावातून तब्बल पाच हजार किलो गोमांस जप्त

Ahmednagar News : बेकायदेशीररित्या गोमांसाची वाहतूक करणारा ट्रक पकडून तालुका पोलिसांनी पाच टन गोमांस जप्त केले. संगमनेर तालुक्यातील कसारे गावच्या शिवारातील जांभुळवाडी फाटा ते विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी ही कारवाई करून साडेबारा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जाकीरखान नसीरखान पठाण, रा. मोगलपुरा व अय्युब मेहबुब कुरेशी, रा. कुरणरोड, संगमनेर हे दोघे आयशर ट्रकमधून (एमएच १७ बीवाय ७८२४) गोमांस घेऊन जात असल्याची माहिती गुप्त खबऱ्याकडून मिळाली होती.

त्यानुसार पोलिस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र पालवे आणि दत्तात्रय बडघे यांच्या पथकाने सापळा लावून हा ट्रक पकडला. या कारवाईत पोलिसांनी ७ लाख ५० हजार रुपयांचे पाच टन गोमांस आणि ५ लाख रुपयांचा ट्रक असा एकूण १२ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय बडधे यांनी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागातून अशा पद्धतीच्या कारवाया सुरु आहेत. परंतु तरीही गोवंश कत्तल बंद होताना दिसत नाही.

संगमनेर, अहमदनगर शहर आदी भागात अशा घटना जास्त दिसत आहेत. अनेक संघटना याबाबत आंदोलने देखील करतात. तसेच पोलीस देखील वांरवार कारवाई करत आहेत. परंतु गोवंश कत्तल करणे, वाहतूक करणे आदी गोष्टी मात्र कमी होताना दिसत नाहीत. आता यावर कडक कायदा बनवून अशा गोष्टी करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts