अहमदनगर क्राईम

अहमदनगर जिल्ह्याला हादरवणारी घटना ! चक्क नगरसेवकाच्या तालमीमध्ये मुलावर….

Ahmednagar News :- पारनेरच्या एका तालीममध्ये अल्पवयीन मुलावर समलैंगिक अत्याचाराचा प्रकार समाेर आला आहे.

याप्रकरणी पीडित मुलाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाैघांविरुद्ध पारनेर पाेलिसांनी गुन्हा नाेंदवला आहे. फिर्यादीनुसार पोलिसांनी बाललैंगिक अपराधासह लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

नगरसेवक युवराज पठारे, विशाल सर (पूर्णनाव माहिती नाही), आकाश (पूर्णनाव माहिती नाही) व विशाल सर (पूर्णनाव माहिती नाही) यांच्याविराेधात गुन्हा नाेंदवला आहे.

दरम्यान, मुलांच्या भांडणाला राजकीय स्वरूप देऊन खोटे गुन्हे दाखल केले जात आहे. लाल मातीला काेणी बदनाम केल्यास ते खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे यांनी दिला आहे.

नगरपंचायतमधील शिवसेनेचे नगरसेवक युवराज पठारे याच्या मालकीच्या तालमीत हा प्रकार घडला आहे.

हा प्रकार दडपण्यासाठी युवराज पठारे व त्याच्या साथीदारांनी अल्पवयीन मुलगा, त्याचे वडील आणि वडिलांच्या दोन मित्रांना मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts