अहमदनगर क्राईम

Ahmednagar News : सासूरवाडीत जावयाचा खून, पत्नीसह मेहुण्याला अटक

Ahmednagar News : बीड जिल्ह्यातून केडगाव येथील सासूरवाडीत आलेल्या जावयाचा मारहाण करत खून करण्यात आला. तसेच, पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह नगर-पाथर्डी रोडवरील बारदरी शिवारात टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ही घटना मंगळवारी (दि. २३) रात्री दहा वाजेच्या सुमारास केडगाव परिसरात घडली. प्रशांत जगन्नाथ घाटविसावे (वय २८, रा. केळपिंपळगा, ता. आष्टी, जि. बीड) असे मयताचे नाव आहे, याप्रकरणी मयताच्या पत्नीसह मेहुण्याला अटक करण्यात आली आहे.

पत्नी कल्याण प्रशांत घाटविसावे (रा. केळपिंपळगाव, ता. आष्टी, जि. बीड, हल्ली रा. केडगाव), सोमनाथ बनकर, मेहुणा अजय सोमनाथ बनकर, सासू वैशाली सोमनाथ बनकर, मेहुणी प्रियंका सोमनाथ बनकर (सर्व रा. शास्त्रीनगर, केडगाव), मोहित दिनेश पाडळे (रा. भोरी चाळ, रेल्वे स्टेशन रोड, केडगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत मयताचा चुलत भाऊ किशोर बापूराव घाटविसावे यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीचा चुलतभाऊ २३ एप्रिल रोजी सासूरवाडीला केडगाव येथे आला होता. त्याला बळजबरीने दारू पाजून मारहाण करून जिवे ठार मारले व मृतदेह नगर-पाथर्डी रोडवरील बारदरी शिवारात टाकून देण्यात आला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारी घटना काही कमी होण्याचे चिन्ह दिसेनात. गुन्हेगारी घटना , मारहाण, खून आदी घटना अहमदनगर जिल्ह्यात वाढीस लागल्या आहेत. खाकीचा धाक गुन्हेगारांना राहिला नाही का अशी स्थिती सध्या निर्माण झाली असल्याचे लोक बोलत आहेत. पोलिसांनीच आता कायद्याची कडक अंमलबजावणी करत असल्या गुन्हेगारी वृत्तींना आळा घातला पाहिजे असे नागरिक म्हणत आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office