अहमदनगर क्राईम

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये खुनाचे सत्र सुरूच ! बापानेच पोटच्या मुलाला संपवले, मृतदेहाची दुर्गंधी पसरल्याने घटना समोर

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारी घटना सातत्याने समोर येत आहेत. मागील काही दिवसांत खुनासारख्या काही घटना समोर आल्या. या गुन्ह्यांची उकल होतेना होते तोच आता अहमदनगरमधून आणखी एक खुनाचे प्रकरण उजेडात आले आहे.

स्वतः पित्यानेच पोटाच्या मुलाचा खून केला आहे. धक्कादायक म्हणजे मृतदेहाची सर्वत्र दुर्गंधी पसरल्याने गुन्ह्यांची उकल झाली. स्वतः आईनेच याबाबत फिर्याद दिली. ही घटना नेवासे तालुक्यातील गोधेगाव येथे घडली आहे. शिवाजी दादासाहेब जाधव (रा. गोधेगाव, ता. नेवासे) असे मृताचे नाव आहे.

अधिक माहिती अशी : नेवासे तालुक्यातील गोधेगाव येथील शेतकरी दादा सारंगधर जाधव व त्यांचा मुलगा शिवाजी दादासाहेब जाधव (रा. गोधेगाव, ता. नेवासे) यांच्यात शेती वाटपाच्या कारणावरून सतत वाद होत होता.

या भांडण- तंट्याच्या वादातून दादा जाधव यांनी मुलगा शिवाजीच्या डोक्यात लाकडी फळीने मारहाण करून खून केल्याची घटना मंगळवारी (ता.१४) सायंकाळी सुमारास घडली. पाच वाजण्याच्या १८ मे रोजी मृतदेहाची सर्वत्र दुर्गंधी पसरल्याने गुन्ह्यांची उकल झाली.

शिवाजीची आई अलका दादासाहेब जाधव हिच्या फिर्यादीवरून आरोपीस ताब्यात घेऊन दादा जाधव याच्याविरुद्ध नेवासे पोलिस ठाण्यात ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्रसिंग ससाणे करीत आहेत.

घटनास्थळाची उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांनी पाहणी केली. दरम्यान दोनच दिवसांपूर्वी नेवासे तालुक्यातील देडगांव येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली होती.

येथील पाटाच्या पाण्यात अज्ञात इसमाचे तुकडे करुन एका गोणीत भरुन फेकून देण्यात आल्याची घटना समोर आली होती. या घटनेचा अद्याप उलगडा झालेला नाही तोच आणखी एक खून झाला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts