अहमदनगर क्राईम

Ahmednagar News Today : जिल्हयात ‘ह्या’ ठिकाणी सर्वात मोठया कुस्ती स्पर्धा ! युवतींच्या कुस्त्याही …

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2022 Ahmednagar News :- अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वनकुटे येथील चरपटीनाथ महाराजांच्या १३ ते १५ एप्रिल दरम्यान पार पडणाऱ्या यात्रोत्सवानिमित्त १५ एप्रिल रोजी नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या पुढाकारातून जिल्हयातील सर्वात मोठया कुस्तीच्या मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे.

मैदानात विजेतेपद पटकाविणाऱ्या मल्लास दोन लाख रूपये तसेच आमदार नीलेश लंके यांच्या वतीने चांदीची गदा प्रदान करण्यात येणार आहे. राज्यातील सुमारे शंभर नामवंत मल्ल या मैदानात एकमेकांविरोधात झुंजणार असल्याची माहीती सरपंच अ‍ॅड. राहूल झावरे यांनी दिली.

या मैदानासाठी आमदार नीलेश लंके, मावळचे आमदार सुनिल अण्णा शेळके यांच्यासह जिल्हयातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

युवतींच्या कुस्त्याही रंगणार कुस्ती क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षांपासून युवतींनीही छाप पाडलेली असून युवतींच्या कुस्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या मैदानात विविध नामांकित युवतींच्या कुस्त्यांचेही आयोजन करण्यात आले आहे.

मतदार संघातील मल्लांचा होणार गौरव पारनेर नगर मतदारसंघातील यापूर्वी कुस्तीचे मैदान गाजविलेल्या मल्लांचा यावेळी नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या वतीने गौरव करण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. राहूल झावरे यांनी सांगितले.

ह्या असतील प्रमुख लढती या मैदानात कोल्हापूर येथील गंगावीश तालमीचा मल्ल माऊली जमदाडे व नगर येथील उपमहाराष्ट्र केसरी योगेश पवार यांच्यात दोन लाखांचे इनाम असलेली लढत रंगणार आहे.

या लढतीमध्ये विजेतेपद पटकाविणाऱ्या मल्लास आमदार नीलेश लंके यांच्या वतीने दोन किलो वजनाची चांदीची गदा भेट देण्यात येणार आहे. दुसरी लढत अकलुज येथील महाराष्ट्र चॅम्पियन विलास डोईफोडे व सहयाद्री संकुलाचा महाराष्ट्र चॅम्पियन विष्णू खोसे यांच्यात होईल.

त्यातील विजेत्यास १ लाख ५० हजारांचे इनाम देण्यात येईल. नॅशनल चॅम्पीयन माऊली कोकाटे व अमोल बुचूडे अ‍ॅकॅडमीचा समीर देसाई यांच्यात तिसरी लढत होईल.

त्यातील विजेत्यास १ लाखांचे इमाम देण्यात येईल. ७५ हजारांच्या इनामासाठी चौथी लढत नगरचा सुरेश पालवे व पुण्याचा वैभव फलके यांच्यात होईल.

पाचवी लढत पारनेरच्या छत्रपती कुस्ती संकुलाचा अनिल लोणारी व नगरचा अण्णा गायकवाड यांच्यात, सहावी लढत छत्रपती कुस्ती संकुलाचा अनिल ब्राम्हणे व नगरचा अक्षय पवार यांच्यात, छत्रपती कुस्ती संकुलाचा ॠषी लांडे व पुण्याचा विजय पवार यांच्यात सातवी लढत हाईल. पाचव्या, सहाव्या व सातव्या लढतींच्या विजेत्यांना प्रत्येकी ५१ हजारांचे इनाम देण्यात येणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts