अहमदनगर क्राईम

जखमी अवस्थेत सापडलेल्या 50 वर्षीय अनोळखी पुरूषाचा मृत्यू

Ahmednagar News : शहरातील टिळक रोड येथे आजारी अवस्थेत आढळून आलेल्या 50 वर्षीय अनोळखी पुरूषाचा जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.11 मे रोजी टिळक रोड येथे एक 50 वर्षीय पुरूष आजारी अवस्थेत आढळून आला होता.

त्याला स्थानिकांनी रूग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केेले. तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

मयत व्यक्तीची ओळख पटली नसून याबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी कोतवाली पोलिसांशी संपर्क साधावा, असे आव्हान पोलीस अंमलदार नितीन गाडगे यांनी केले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts