अहमदनगर क्राईम

मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर अज्ञाताने भिरकावली चप्पल

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Maharashtra News:- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पूर्णानगर येथे अटल बिहारी वाजपेयी उद्यानाच्या उद्घाटन समारंभाला आले होते. यावेळी गर्दीतून एका अज्ञाताने त्यांच्या गाडीवर चप्पर भिरकावल्याची घटना घडली आहे.

दरम्यान या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. पिंपरी-चिंचवड पोलीस या अज्ञाताचा शोध घेत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवडमध्ये अटल बिहारी वाजपेयी उद्यानासह इतर विकासकामांचे उद्घाटन होणार होते.

पिंपळे निलखमधील शहीद अशोक कामटे उद्यानाचे उद्घाटन करून देवेंद्र फडणवीस यांचा ताफा पूर्णानगरच्या दिशेने निघाला.

मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्णानगर येथील अटल बिहारी वाजपेयी उद्यानाचे काम निकृष्ट दर्जाचं झालं असल्याचा आरोप करत प्रचंड घोषणाबाजी केली. यावेळी एका व्यक्तीने थेट देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनाच्या दिशेने चप्पल भिरकावली.

फडणवीस यांच्या दौऱ्याला राष्ट्रवादीकडून झालेल्या विरोधानंतर भाजपचेही कार्यकर्ते आक्रमक झाले. घटनास्थळी तणाव वाढला आणि भाजप व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आले.

या पार्श्वभूमीवर जमावाला पांगवण्याासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. त्यामुळे कार्यकर्ते आणि परिसरात उपस्थित असलेल्या इतर नागरिकांचीही चांगलीच धावपळ उडाली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts