अहमदनगर क्राईम

मंडलाधिकारी, तलाठ्याच्या तावडीतून डंपर, जेसीबी पळविला

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022 Ahmednagar News :- चोरट्या मार्गाने उत्खनन करून मुरूमाची वाहतूक करणार्‍यांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंडलाधिकारी वैशाली एकनाथ हिरवे (वय 37 रा. नेप्ती रोड, केडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. नगर तालुक्यातील निमगाव घाणा येथे ही घटना घडली.

मंडलाधिकारी हिरवे व तलाठी सुरेश सखाराम देठे असे अनाधिकृत गौण खनिज व त्याची चोरटी वाहतूक करणार्‍या वाहनावर कारवाई करत असताना त्यांना डंपर (एमएच 16 क्यू 7269) मध्ये अनाधिकृत मुरूम जेसीबीच्या सहाय्याने भरताना काही व्यक्ती मिळून आल्या.

मंडलाधिकारी हिरवे व तलाठी देठे यांनी त्यांच्यावर कारवाई करून डंपर, जेसीबी नगर तहसील कार्यालय येथे घेऊन येण्यास सांगितले.

दरम्यान त्यांनी डंपर व जेसीबी तहसील कार्यालयात घेऊन न जाता ते घेऊन पळुन गेले आहे, असे हिरवे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार सय्यद हे करीत आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts