अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Ahmednagar Crime :- रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात डिजे का चालू ठेवला. असे विचारल्याचा राग आल्याने राहुरी तालुक्यातील पाथरे येथील बाळासाहेब गांगुर्डे या वयोवृद्ध इसमाला
तिघा जणांनी मिळून लाथा बूक्क्यांनी व काठीने मारहाण केल्याची घटना घडल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात दि 21 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पाथरे येथे रात्री उशिरापर्यंत डिजे मोठ्या आवाजात चालू होता. त्यावेळी बाळासाहेब प्रभाकर गांगुर्डे यांनी डिजे लावून नाचणाऱ्यांना विचारले कि, रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात डिजे चालू का ठेवला.
याचा राग मनात धरून आरोपींनी पाथरे बुद्रुक येथील चौकात बाळासाहेब गांगुर्डे यांना शिवीगाळ करत लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. आणि काठीने मारून जखमी केले.
तसेच त्यांची सुन व नातीस शिवीगाळ करुन धमकी दिली. बाळासाहेब गांगुर्डे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद नोंदवीली.
त्याप्रमाणे आरोपी सिद्धेश्वर कल्याण जाधव, बाळासाहेब मोतीराम हापसे, आण्णासाहेब भागवत औटी राहणार पाथरे बुद्रुक ता. राहुरी. या तिघांवर मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय