१० जानेवारी २०२५ नगर : शहरातील स्टेशन रोडवर आनंदनगर – परिसरात एका वृद्धाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत त्यांच्या राहत्या घरात बुधवारी (दि.८ जानेवारी) दुपारी ४ च्या सुमारास आढळून आला आहे.अशोक मोतीलाल मंत्री (वय ६१) असे मयताचे नाव आहे.
मयत अशोक मंत्री हे अविवाहित होते.ते घरात एकटेच राहात होते. त्यांना १ भाऊ, २ विवाहित बहिणी, पुतणे, भाचे आहेत. त्यांच्या नांदगाव शिंगवे येथे राहणाऱ्या बहिणीशी ते रविवारी फोनवर बोलले होते.त्यानंतर ३ दिवस त्यांचा कोणाशीही संपर्क झालेला नव्हता.
बुधवारी दुपारी त्यांच्या शेजारी राहणाऱ्यांना त्यांच्या घरातून दुर्गंधी येवू लागल्याने त्यांनी त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क केला.त्यांचे नातेवाईक आल्यावर त्यांनी घराचा दरवाजा उघडून पाहिला असता अशोक मंत्री यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.याबाबत कोतवाली पोलिसांना माहिती देण्यात आली.कोतवाली पोलिसांनी या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.