संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील युवक तब्बल गेल्या साडेचार महिन्यांपासून घरातून बेपत्ता झालेला आहे. सोमनाथ राजाराम गायकवाड (वय ३२), असे बेपत्ता युवकाचे नाव आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात मिसिंग रजिस्टरला सदर युवक बेपत्ता असल्याची नोंद केलेली आहे. त्यामुळे आपल्या बेपत्ता भावाचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशी मागणी दत्तू राजाराम गायकवाड यांनी केली आहे.
संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील रहिवासी सोमनाथ राजाराम गायकवाड हा युवक तळेगाव दिघे येथील पेट्रोल पंपावर जातो, असे सांगून शनिवारी (दि.२) मार्च २०२४ सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घरातून बाहेर पडला.
त्यानंतर मात्र तो पुन्हा घरी परतला नाही. त्याची उंची ५ फूट २ इंच, केस काळे व बारीक, डाव्या पायाच्या करंगळीचे बोट चिकटलेले, मिशी बारीक व काळी, अंगात लाल रंगाचा शर्ट, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, निळ्या रंगाचे जर्किंग, पायात काळे सँडल, सोबत असलेला मोबाईल, असे त्याचे वर्णन आहे.
सोमनाथ गायकवाड हा घरी न परतला नसल्याने कुटुंबियांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. त्यानंतर याप्रकरणी त्याचा भाऊ दत्तू राजाराम गायकवाड (वय २९, रा. काकडवाडी) यांनी तालुका पोलिसांना खबर दिली.
त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात मिसिंग रजिस्टरला सदर युवक बेपत्ता असल्याची करण्यात आली आहे. सदर बेपत्ता युवकाबाबत कुणाला काही माहिती असल्यास संगमनेर तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र पालवे व दत्तात्रय बडधे यांनी केले आहे.
मात्र तब्बल साडेचार महिन्यांपासून सदर बेपत्ता युवकाचा शोध पोलिसांना लागलेला नाही. त्यामुळे आपल्या बेपत्ता भावाचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशी मागणी दत्तू राजाराम गायकवाड यांनी निवेदनाद्वारे केली आहे.