अहमदनगर क्राईम

Ahmednagar Crime News : आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला मनमाडमधून अटक !

Ahmednagar Crime News : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फरार असलेल्या पतीला एमआयडीसी पोलिसांनी मनमाड येथून अटक केली आहे. मिरिनमय निहार मृधा (वय ३५, रा. कालिनगर, ता. मुलचेरा, जि. गडचिरोली) असे अटक केलेल्या इसमाचे नाव असून, आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला ४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

याबाबत प्रतिलता गौरपद मिस्त्री (रा. विजयनगर, कालिकानगर, जि. गडचिरोली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी मिरिनमय मृधा हा मूळचा गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी आहे.

तो सध्या पत्नीसह येथील वनराई कॉलनी (ता. नगर) येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. चारित्र्यावर संशय घेत तो पत्नीला मारहाण करीत होता. तू माझ्यासोबत का राहत नाहीस? असे म्हणून तो पत्नीला सतत मारहाण करीत असे.

त्याच्या छळास कंटाळून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तेंव्हापासून आरोपी फरार होता. फरार आरोपी मनमाड येथे असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

सहायक पोलिस निरीक्षक सानप यांनी मनमाड येथे पथक पाठवून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला ४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts