अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Ahmednagar Crime :- तरूणीला शिवीगाळ करत तिचा विनयभंग केल्याची घटना अहमदनगर शहरात घडली. या प्रकरणी तिघांविरूध्द विनयभंग, शिवीगाळ, मारहाण आदी कलमान्वये तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित तरूणीने फिर्याद दिली आहे. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणीसोबत आरोपींनी गैरवर्तन केले आहे. विवेक गावडे, महेश सोमवंशी (पूर्ण नावे माहिती नाही, दोघे रा. गावडे मळा, सावेडी) व सत्यजित ढवण (पूर्ण नाव माहिती नाही, रा. ढवणवस्ती, तपोवन रोड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
शनिवारी रात्री अहमदनगर शहरात ही घटना घडली. शनिवारी रात्री विवेक गावडे आणि सत्यजित ढवण हे दोघे फिर्यादी यांच्या वडिल आणि भावाला मारहाण करत होते.
तो आवाज ऐकुण फिर्यादी तेथे गेल्या. त्यावेळी विवेक हा त्यांना म्हणाला,‘तु बाजुला हो’, असे म्हणत त्यांच्या कुडत्याच्या कॉलरला पकडुन त्याचे जवळ ओढून विनयभंग केला.
महेश सोमवंशी याने फिर्यादीच्या वडिलाला शिवीगाळ केली. आरोपींनी फिर्यादीचा भावाला व वडिलांना मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.