अहमदनगर क्राईम

जामिनासाठी न्यायाधीश न्यायालयात ! लाचखोरी प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज ; सुनावणी १५ जानेवारीला

१० जानेवारी २०२५ मुंबई : लाचखोरीच्या आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या सातारा जिल्ह्यातील सत्र न्यायाधीशाने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयाचे धाव घेतली आहे.न्यायधीशावर एका आरोपीला जामीन देण्यासाठी ५ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांनी दाखल केलेल्या या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांनी १५ जानेवारी रोजी चेंबरमध्ये सुनावणी घेण्यास तयारी दर्शवली आहे.एका महिलेने केलेल्या तक्रारीनंतर अन्य आरोपींसह न्यायाधीश धनंजय निकम यांच्याविरुद्ध लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यामुळे अटकेची टांगती तलवार राहिल्याने निकम यांनी अॅड. विरेश पुरवंत यांच्यामार्फत उच्च न्यायलायात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली आहे.या याचिकेवर न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांच्या समोर सुनावणी झाली.

यावेळी निकम यांच्या वतीने अॅड. पुरवंत यांनी न्यायाधीश निकम हे या प्रकरणात निर्दोष असून त्यांना नाहक गोवण्यात आले आहे.न्यायाधीश निकम यांना तक्रारदार आणि इतर आरोपींमधील बैठकांची माहिती नव्हती किंवा तक्रारदार निकम यांच्याशी संबंधित नव्हता.

निकम यांनी कुठल्याही प्रकारे पैशांची मागणी केलेली नाही किंवा लाचेचे पैसे स्वीकारलेले नसल्याचे स्पष्ट केले.न्यायालयाने युक्तिवादाची गंभीर दखल घेत जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास तयारी दर्शवली.ही सुनावणी चेंबरमध्ये घेतली जाईल व त्या सुनावणीमध्ये एका न्यायिक अधिकाऱ्याचा समावेश असेल, असे न्यायमूर्ती बोरकर यांनी स्पष्ट केले.

एसीबीचे आरोप

एसीबीच्या म्हणण्यानुसार, मुंबईतील किशोर खरात व सातारा येथील आनंद खरात या दोन आरोपींनी निकम यांच्या सांगण्यावरून जामीन मंजुरीचा आदेश देण्यासाठी एका महिलेकडून ५ लाख रुपयांची मागणी केली.३ ते ९ डिसेंबर २०२४ यादरम्यान केलेल्या चौकशीत लाच मागण्यात आल्याचे उघड झाल्याचे एसीबीने म्हटले आहे.याप्रकरणी एसीबीने निकम यांच्यासह किशोर खरात,आनंद खरात व अन्य एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Sushant Kulkarni

Published by
Sushant Kulkarni

Recent Posts