Ahmednagar Crime : घरासमोरील सुबाभळ तोडली म्हणून सासु, दिर व पुतण्याने अलका शेलार यांना मारहाण करून जखमी केल्याची घटना दिनांक २४ ऑगस्ट २०२३ रोजी राहुरी तालुक्यातील मानोरी येथे घडलीय. याबाबत तिघा जणांवर राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
याबाबत पोलिसांनी सांगितले, की अलका विलास शेलार (वय ४३ वर्षे) या राहुरी तालुक्यातील मानोरी येथे राहत आहेत. त्यांच्या घराशेजारी त्यांचा दीर कैलास शेलार हा त्याच्या कुटुंबासह राहण्यास आहे.
त्यांची घराजवळ सामाईक शेती असुन शेतीच्या कारणावरुन तो व त्याचे घरातील लोक अलका शेलार यांच्याशी नेहमी भांडण करत असतात. दि. २४ ऑगस्ट २०२३ रोजी सांयकाळी ५ वा. सुमारास अलका शेलार या त्यांच्या घरा समोरील लाईटचे ताराखाली आलेले सुबाभुळीचे झाडे तोडत होत्या.
त्यावेळी तेथे आरोपी आले आणि अलका शेलार यांना शिवीगाळ करुन म्हणाले, तु काय शेतीची मालकीण झाली आहे का? मालक आम्ही आहोत. तु सुबाभुळ तोडु नको. तेव्हा अलका शेलार त्यांना म्हणाल्या, सुबाभुळी लाईटच्या तारेमध्ये गुंतली आहे. शॉर्ट सर्किट होऊन तारा तुटतील.
तेव्हा आरोपींनी अलका शेलार यांना दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच तुला आम्ही येथे राहु देणार नाही. तुला येथून पळुन लावु. तु येथे कशी राहते, ते पाहु, अशी धमकी दिली.
घटनेनंतर अलका विलास शेलार यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानूसार आरोपी दिर- कैलास कुंडलिक शेलार, सासु- राधाबाई कुंडलिक शेलार, पुतण्या- रामकृष्ण कैलास शेलार (सर्व रा. मानोरी, ता. राहुरी) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.