अहमदनगर क्राईम

Ahmednagar Crime News : लहान मुलांच्या भांडणावरून नणंद, भावजयीला मारहाण

Ahmednagar Crime News : लहान मुलांमध्ये झालेल्या वादाच्या कारणावरुन सात जणांनी मिळून भावजय व नणंद यांना दगड, लाकडी दांडा व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना राहुरी तालुक्यातील गुहा येथे घडली.

याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की गयाबाई अजय जाधव, वय ५० वर्षे, या राहुरी तालूक्यातील गुहा येथे राहतात. दुपारच्या सुमारास गयाबाई जाधव व त्यांची ननंद वैशाली दिपक पैसे, सासु- इमल गोरख जाधव या तिघी घरी असताना तेथे आरोपी आले आणि लहान मुलांमध्ये झालेल्या वादाच्या कारणावरुन म्हणाले की,

तु आमच्या मुलाल मारहान का केली. असे म्हणुन शिवीगाळ करु लागले. त्यावेळी गयाबाई जाधव त्यांना म्हणाल्या की, मी दोन्ही मुलाना भांडने करु नका, असे समाजवुन सांगीतले आहे.

तुम्ही माझेशी वाद घालु नका. असे म्हणाल्याचा त्यांना राग आल्याने आरोपींनी गयाबाई जाधव व त्यांची नणंद वैशाली पैसे या दोघींना शिवीगाळ करत दगड, लाकडी दांडा व लाथा बुक्याने मारहान करुन जखमी केले.

जखमी झालेल्या दोघींनी अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेऊन राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गयाबाई अजय जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपी अशोक भाऊसाहेब मोरे, निपुल अशोक मोरे, दादा अशोक मोरे, नवनाथ अशोक मोरे,

अलका अशोक मोरे, उषा निपुल मोरे, मंगल दादा मोरे (सर्व रा. टाकळिमियाँ, ता. राहुरी) यांच्यावर गुन्हा रजि. नं. २४४/ २०२४ नुसार भा.दं. वि. कलम ३२३, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ प्रमाणे शिवीगाळ, मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts