अहमदनगर Live24 टीम, 25 ऑक्टोबर 2021 :- तालुक्यातील गंभीर गुन्ह्यांची संख्या करण्यासाठी गुन्हे दाखल करण्याऐवजी चक्क गुन्हे दडपण्याचे प्रकार पारनेर पोलिस करत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
पारनेर तालुक्यातील सोबलेवाडी येथे भाऊबंदकीच्या वादातून एका शेतकरी कुटुंबातील महिलेचे कपडे फाडून मारहाण करण्याची घटना शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याऐवजी चक्क अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सध्या तालुक्यात इतर गंभीर गुन्ह्यांसह महिला अत्याचारांच्या घटनांत वाढ होत आहे.
या पार्श्वभूमीवर गुन्ह्याचे गांभीर्य कमी करण्यासाठी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याऐवजी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. याबाबत पीडित महिला व तिचे कुटूंबिय पोलीस अधीक्षकांकडे दाद मागणार आहे.
शुक्रवारी रात्री१० वाजेच्या सुमारास पीडित महिला तिच्या घरात झोपलेली असताना तीन पुरुष व एक महिला यांनी पीडित महिलेला घरातून बाहेर बोलावले.
त्यानंतर झालेल्या भाऊबंदकीच्या वादातून पीडित महिलेला बेदम मारहाण करीत योगेश म्हस्के यांच्या पत्नीने पीडितेच्या अंगावरील कपडे फाडले. अशा आशयाची तक्रार पीडितेने पारनेर पोलीस ठाण्यात दाखल केली.