अहमदनगर क्राईम

धक्कादायक घटना ! व्यापाऱ्याला चाकू लावून लुटले

श्रीरामपूर : दुचाकीवरून जाणाऱ्या एका व्यापाऱ्याला चाकू लावून त्याच्या गळ्यातील सोन्याची साखळीसह २० हजार रुपयांची रोकड तिघा चोरट्यांनी लुटली. तसेच व्यापार्‍याला बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.

याप्रकरणी येथील शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेलापूर येथील व्यापारी बाळकृष्ण गोविंद खोसे (वय ६४) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

ते रविवारी ते दुकानातील माल आणण्यासाठी राहाता येथे गेले होते. तेथून दुपारी टिळकनगरहून बेलापूरकडे जात असताना हा प्रकार घडला. रांजणखोल चौकामध्ये दोघा चोरट्यांनी खोसे यांना अडविले.

त्यावेळी त्यांच्या दुचाकीव बसून गाडी टिळकनगर कारखान्याकडे घेण्यास सांगितले तेथे त्यांचा आणखी एक साथीदार आला. तिघांनी खोसे यांच्याकडील २० हजार रुपये तसेच सोन्याचं साखळी, असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल काढून घेतल’ खोसे यांना बेदम मारहाण केल मारामारी दरम्यान खोसे यांन आरडाओरड सुरू केला.

त्यामुळे तिघा चोरट्यांनी खोसे यांच्या दुचाकीवरून तेथून पळ काढला. खोसे यांनी पोलिसांना चोरट्यांची माहिती दिल्यानुसार पोलीस पथक त्यांचा शोध घेत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts