अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Ahmednagar Crime :- अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी अक्षय अशोक भिंगारदिवे (वय 22 रा. शिवाजीनगर, केडगाव) या युवकाला जिल्हा न्यायाधीश श्रीमती माधुरी
एच. मोरे यांनी दोषीधरून भादंवि कलम 354 (अ) (ड) तसेस पोक्सो कायद्यान्वये एक महिना सक्तमजुरी व दोन हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
11 जून 2018 रोजी पीडित अल्पवयीन मुलगी (वय 14) क्लासेसवरून पायी घरी जात असताना अक्षय भिंगारदिवे व त्याचा मित्र हे दुचाकीवरून पीडित मुलीच्या पाठीमागून आले. अक्षयने दुचाकी पीडित मुलीसमोर आडवी लावून तिचा रस्ता आडवला व पीडित मुलीला म्हणाला, ‘‘ मला तुझेशी बोलायचे आहे’’,
त्यावर पीडित मुलीने त्याला म्हणाली, ‘‘तु माझेशी बोलत जावु नकोस, माझा पाठलाग करू नको’’, अशा प्रकारचे संभाषण झाल्यानंतर ते घटनास्थळावरून निघून गेले.
पीडिताने हा प्रकार घरी सांगितल्यानंतर तिचा भाऊ व अक्षय यांच्यात वाद झाले. यानंतर पीडिताच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक के. डी. शिरदावडे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकिल मनिषा पी. केळगंद्रे- शिंदे यांनी काम पाहिले.
न्यायालयासमोर आलेले साक्षी-पुरावे, सरकारी पक्षाचा युक्तवाद ग्राह्यधरून आरोपीला न्यायालयाने दोषीधरून शिक्षा ठोठावली आहे.