Ahmednagar Crime News : आज तुम्हाला एक एकाला जिवेच मारतो, असे म्हणत एका आरोपीने कुऱ्हाडीने घराची व मोटरसायकलची तोडफोड करून जनावरांना क्रूरपणे मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथे दिनांक ३१ जुलै रोजी घडली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले, की नाना रभाजी औटी (वय ७५ वर्षे) हे राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथे राहतात. त्यांच्या शेताशेजारी आरोपी ज्ञानेश्वर विठ्ठल हारदे याची शेती असुन शेताच्या बांधावरुन त्यांच्यात चार ते पाच महिन्यापूर्वी वाद झाले होते.
ते वाद आपसात बसुन मिटवुन घेतले होते. दिनांक ३१ जुलै २०२३ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास नाना रभाजी औटी हे घराजवळील शेतात गवत घेत असताना त्यांच्या घरी आरोपी आला व मोठमोठ्याने शिवीगाळ करु लागला.
त्यावेळी त्याच्या हातात लाकडी दांडा असलेली कुऱ्हाड होती. नाना औटी यांनी त्याला लांबुनच विचारले की, काय झाले तेव्हा तो म्हणाला की, आज तुम्हाला एक एकाला जिवच मारतो, असे म्हणून त्याने औटी यांच्या घराच्या खिडक्याच्या काच्या फोडल्या, लाकडी दरवाज्यावर कुऱ्हाडीने घाव घातले. तुळशी वृंदावन पाडुन टाकले.
तसेच घरासमोरील मोटार सायकलची तोडफोड केली. त्यानंतर औटी यांच्या घरातील सामान अस्ताव्यस्त फेकून घरगुती वस्तुची मोडतोड करुन नुकसान केले. तसेच घरासमोर बांधलेल्या गायांना कुन्हाडीच्या दांड्याने मारहाण केली.
घटनेनंतर नाना रभाजी औटी यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी ज्ञानेश्वर विठ्ठल हारदे (रा. ताहराबाद, ता. राहुरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.