८ जानेवारी २०२५ राहुरी शहर : पतीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या महिलेसह तिच्या प्रियकरास राहुरी पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.येथील न्यायालयाने त्या दोन्ही आरोपींना चार दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, (दि. ४) रोजी राहुरी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला होता.सदर गुन्ह्यातील आरोपींनी मयतास आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय आर. ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल, पोलीस नाईक रामनाथ सानप, पोलीस हवालदार जानकीराम खेमणार, पोलीस शिपाई अविनाश दुधाडे, रवींद्र कांबळे, आजिनाथ पाखरे यांनी केलेली आहे.